पर्यटनातून कोकणचा 'सुवर्णदुर्ग' आता जगभरात पोचणार

सुवर्णदुर्ग या उपेक्षित जलदुर्गाचे नशिब आता उजळणार आहे.
कोकण
कोकणईसकाळ
Summary

सुवर्णदुर्ग या उपेक्षित जलदुर्गाचे नशिब आता उजळणार आहे.

दाभोळ : स्वराज्याच्या आरमाराचे वैभव असलेला व सागरी लाटांशी झुंजत उभ्या असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग या उपेक्षित जलदुर्गाला जणू नवसंजीवनी मिऴणार आहे. सागरी पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोचावेत, यासाठी 'सी फोर्ट सर्किट टुरिझम' प्रकल्प शासकीय पातळीवर राबवण्यासाठी प्राथमिक पाऊले ऊचलण्यात आली आहेत. याचा भाग म्हणून सुवर्णदुर्ग (हर्णै) व पद्मदुर्ग (जिल्हा रायगड) या जलदुर्गामध्ये जाण्यासाठी जेट्टी बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

सुवर्णदुर्ग या उपेक्षित जलदुर्गाचे नशिब आता उजळणार आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी जेट्टी बांधण्यास महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यासाठी प्रयत्न केले असून, राज्यातील जलदुर्गाचे वैभव असेलेले हे किल्ले सागरी पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोचावेत, अशी कल्पना आहे, 'सी फोर्ट सर्किट टुरिझम' प्रकल्प शासकीय पातळीवर राबवला जावा, यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यानी नुकतीच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक व्ही. विद्यावती यांची भेट घेतली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे सर्व जलदुर्गांना जेट्टी बांधणे हा आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे त्यानी पाठपुरावा केला होता. सुवर्णदुर्ग (हर्णै) व पद्मदुर्ग ( जिल्हा रायगड) या जलदुर्गामध्ये जाण्यासाठी जेट्टी बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मार्च २०२२ मध्ये या कामाला सुरवात होणार असून ते मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल.

कोकण
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने वसवलं गाव, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये उल्लेख

किल्ल्याला जोडणारी जेट्टी झाल्यास..

सध्या हर्णै येथील सुवर्णदुर्ग या किल्ल्यात जाण्यासाठी होडीने जावे लागते. अनेक पर्यटक होडीने या किल्ल्यात जातात; मात्र या किल्ल्याला जोडणारी जेट्टी झाल्यास पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यात पर्यटनासाठी जातील. सध्या हर्णै येथील सुवर्णदुर्ग या किल्ल्यात जाण्यासाठी होडीने जावे लागते. अनेक पर्यटक होडीने या किल्ल्यात जातात; मात्र या किल्ल्याला जोडणारी जेट्टी झाल्यास पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यात पर्यटनासाठी जातील.

आरमारी इतिहासात मोठे महत्व

सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले होते. स्वराज्याच्या आरमारी इतिहासात या जलदुर्गांचे अनन्यसाधारण महत्व होते. या जलदुर्गांचे वैभव व त्यांचा गौरवशाली इतिहास जगभर पोचविण्यासाठी 'सी फोर्ट सर्किट टुरिझम' प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर जगभरातील पर्यटक कोकणात आकर्षित होतील आणि पर्यटनाद्वारे रोजगारही मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

कोकण
सिंधुदुर्ग : हापूसची पहिली पेटी मालवणातून रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र

१८ जानेवारी १६७५ (माघ शुद्ध तृतीया, शके १५९६, संवत्सर आनंद, सोमवार)

पद्मदुर्गाच्या बांधकामाच्या संदर्भात कोताई करणाऱ्या किल्लेदार जिवाजी विनायक या कामचुकार ब्राह्मण अधिकाऱ्यास 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो, अशा चाकरास ठिकेठाक केले पाहिजे' अशा आशयाचे कानऊघाडणी करणारे पत्र महाराजांनी पाठवले. हबशी सिद्धी पद्मदुर्गावर अडथळे आणत असता दर्यासारंग व दौलतखान अटीतटीने त्याला तोंड देत होते; मात्र दुर्दैवाने या प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक, दर्यासारंग व दौलतखान यांना रसद व पैशाचा पुरवठा करत नव्हता. त्यामुळे सुभेदाराची तक्रार करण्यात आली. महाराज संतापले आणि जे पत्र पाठवले, त्यात शेवटी, या उपरी बोभाट आलिया तुमचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, गनिमाचे चाकर, गनीम जालेसे ऐसें जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकीद असे, या पत्राचा योग्य नतीजा झाला आणि पद्मदुर्ग कुठल्याही तक्रारीविना पुढे बांधला.

(संदर्भ: पसास 1718)

असा आहे पद्मदुर्ग किल्ला

पद्मदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ आहे. पद्मदुर्ग मुरुडनजीकच्या समुद्रकिनारपट्टीपासून खोल समुद्रामध्ये कासा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याची बांधणी इ. स. १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड येथे असणारा जंजिरा किल्ल्यातील सिद्दीला पायबंद घालण्यासाठी शिताफीने बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. पद्मदुर्ग हा किल्ला कासा बेटावर आहे, म्हणून या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.

कोकण
''प्राणीप्रेम असेल तर मासांहार कमी करा, पण फटाके फोडू द्या''

सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती

इतिहासामधील काही राज्यकर्त्यांनी समुद्रामधून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्री शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आणि जेथे व्यापारी बंदरे आहेत, त्या ठिकाणी अनेक किल्ले बांधले. त्यामधील एक महत्वाचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला. सुवर्णदुर्ग हा किल्ला हर्णै येथे आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १४०० फूट इतकी आहे. या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे गाव म्हणजे दापोली. कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे. पूर्वीच्या काळी आंग्रे कुटुंबाकडे समुद्रकिनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले त्यांच्याकडेच होते आणि त्यामधील एक म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला.

एक दृष्टिक्षेप..

  • सुवर्णदुर्ग सध्या उपेक्षित जलदुर्ग

  • सागरी पर्यटनातून जगात पोचणार

  • भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग राजी

  • मार्च २०२४ पर्यंत जेटी होणार पूर्ण

कोकण
PM मोदी आज केदारनाथमध्ये; बाबा भोलेनाथाची करणार पूजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com