Must See Heritage : विदर्भातील मनसरचा प्राचीन बौद्ध स्तूप ‘अवश्‍य पाहा’ स्थळांच्या यादीत

Must See Heritage : पुरातत्व सर्वेक्षण विभागाने घेतला निर्णय : विदर्भातील तीन स्थळांचा समावेश
Must See Heritage
Must See Heritageesakal

Must See Heritage : मनसर येथे उत्खननात सापडलेले प्राचीन बौद्ध स्तूप आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ‘मस्ट सी हेरिटेज’ (स्मारक पहायलाच हवे)च्या यादीत समाविष्ट झाले आहे. विभागाने ‘आवर्जून पहावा’ असे आवाहनही केले आहे.

भारतात प्राचीन स्मारके, वारसा स्थळांचा वेगळा इतिहास, सांस्कृतिक कला आणि वैभव आहे. मात्र, याबाबत बहुतांश भारतीयांना, देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना माहिती नसते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील वारसा स्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी हेरिटेज'' स्थळांची यादी तयार केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना स्थळे पाहण्याचे आवाहनही केले आहे.

Must See Heritage
Summer Travel : मे महिन्यात कूल राहायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन, ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

विदर्भातील स्थळे

नागपूर रामटेक मार्गावरील मनसर गावातील प्राचीन बौद्ध स्तूप प्रसिद्ध आहे. पर्यटक व इतिहास अभ्यासक येथे भेट द्यायला येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मस्ट सी मॉनुमेंट्स’ यादीत या स्तुपाचा समावेश केला आहे. सोबतच अमरावतीच्या चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील १५ मंदिरे ही विदर्भातील तीन स्थळे पुरातत्त्व विभागाच्या ‘आवर्जून पाहायलाच’ हवीच्या यादीत समावेश केला आहे.

२१ राज्यांतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी हेरिटेज’ अशा स्मारकांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यात २१ राज्यांतील महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत. ही यादी https://asimustsee.nic.in/index.php या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्मारकाला कशी भेट द्याल ?

मनसर येथील प्राचीन बौद्ध स्तुपाला कशी भेट देता येईल, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. जवळचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कोणत्या हंगामात जाणे योग्य आहे. कोणत्या सुविधा मिळतील, इतकेच नाही तर स्तुपाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंट्स’च्या सर्व स्थळांची अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

‘मस्ट सी हेरिटेज’ च्या यादीत विदर्भातील तीन स्थळांचा समावेश ही चांगली बाब असली तरी विदर्भात आणखी बरीच प्राचीन वारसा स्थळे आहेत. त्यांचा सुद्धा समावेश व्हायला हवा.

- प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त, (माजी विभाग प्रमुख- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, रातुम नागपूर विद्यापीठ)

Must See Heritage
Solo Travelling : ..म्हणून आम्हाला 'सोलो ट्रॅव्हलिंग' करायला जास्त आवडतं..! मुली सोलो ट्रॅव्हलिंग करणे का पसंत करतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com