या महागड्या हॉटेल्समध्ये राहायला आयुष्यभराची कमाईही पडेल कमी! | Tourism | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Most Expensive Hotels in the World
या महागड्या हॉटेल्समध्ये राहायला आयुष्यभराची कमाईही पडेल कमी! | Tourism

या महागड्या हॉटेल्समध्ये राहायला आयुष्यभराची कमाईही पडेल कमी!

जगातील सर्वात महागडी हॉटेल्स (The Most Expensive Hotels in the World):

जगभरात फिरण्यासारखी असंख्य ठिकाणे आहेत. तुम्ही अशा असंख्य ठिकांणांबद्दल ऐकलं असेल, परंतु तुम्ही जगातील सर्वात महागड्या हॉटेल्सबद्दल कधी ऐकलंय का? आज आपण जगातील सर्वात महागड्या हॉटेलसंबंधी बोलणार आहोत. ही हॉटेल्स इतकी महागडी आहेत की कित्येक लोकांनी त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील पैसे जरी खर्च केले तरीही ते येथे एक रात्रसुद्धा थांबू शकणार नाहीत.

हेही वाचा: Tourism: मित्रांसह बिनधास्तपणे फिरायचंय? मग या सुंदर ठिकाणांना भेट द्या

1. रॉयल पेंटहाउस सूट, जिनिव्हा (Royal Penthouse Suite, Geneva)-

जिनिव्हातील हॉटेल प्रेसिडेंट विल्सनचे रॉयल पेंटहाऊस सूट खूपच अलिशान आणि महागडे आहे. येथे एक रात्र काढण्यासाठी 57 लाख रुपये आहे.

2. हॉटेल द मार्क, न्युयॉर्क (The Mark Hotel)

अमेरिकेतील न्युयॉर्क शहर में बना द मार्क हॉटेल जगातील सर्वाधिक महागड्या हॉटेलपैकी एक आहे. येथील एका पेंटहाऊस मध्ये एका रात्र राहण्यासाठी साधारणपणे 55 लाख रुपये आहे.

3. हॉटेल प्रेजिडेंट विल्सन (Hotel President Wilson)-

स्वित्झर्लंडमधील हॉटेल प्रेजिडेंट विल्सनमध्ये एक रात्र राहण्यासाठी 38 लाख रुपये आहे. इसमें 12 बेडरुम, बाथरुम, हॅलिपॅड, हर्मिस बाथ इ. सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Tourism | पहिल्यांदाच परदेशी जाताय? मग या गोष्टींची घ्या काळजी

4. फोर सीजन हॉटेल, युएसए (Four Seasons Hotel (USA)-

न्युयॉर्क शहरामध्ये एका हॉटेलात एक रात्र राहण्यासाठी 36 लाख रुपये आहे. येथे लोकांना अनलिमिटेड शॅम्पेन और मसाज दिली जाते.

5. द रॉयल व्हिला, ग्रीस (The Royal Villa, Greece)-

ग्रीसमधील अलिशान हॉटेल द रॉयल व्हिला मध्ये राहणं अनेकांचं स्वप्नं असतं. येथे राहणाऱ्या गेस्टला प्रायव्हेड जेटमधून फिरवलं जातं. येथे 30 लाख रुपये आहे.

6. हॉटेल मार्टिनेज, फ्रान्स (Hotel Martinez, France)-

फ्रान्समधील या हॉटेलात एक रात्र थांबण्यासाठी 26 लाख रुपये खर्च करावे लागतात. या हॉटेलमध्ये प्रायव्हेट बटलर, टर्किश बाथ इ. सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Tourism | तब्बल 2500 वर्षे जुने रुक्मिणी देवी मंदिर ! जाणून घ्या

7. दि स्काय व्हिला, युएसए (The Sky Villa, USA)-

येथे एक रात्र थांबण्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतात. या हॉटेलच्या बेडरुममध्ये रोटेटिंग बेड, टू वे फायरप्लेस आणि इन रुम सोकिंग टब उपलब्ध आहेत.

8. द कनॉट हॉटेल लंडन (The Connaught Hotel London)-

लंडनमधील हे प्रीमियर पेंटहाऊस स्वीट मेफेयर लग्जरीची मजा देते. या हॉटेलमध्ये एक दिवस स्टे करण्यासाठी 15 लाख रुपये लागतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top