
Explore Beautiful Spots
Esakal
Tirupati Darshan Trip: तिरुपती हे भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे श्री वेंकटेश्वर देवतेच्या मंदिराला दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात येथे भक्तांची संख्या अधिक वाढते, कारण हा काळ सण-समारंभ आणि यात्रांसाठी अनुकूल असतो. तिरुपती दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक या काळात प्रवास करतात.