october trip best destination
esakal
टूरिझम
October Trip: ऑक्टोबर ट्रिपसाठी बेस्ट डेस्टिनेशन्स! इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या
Best Places to Visit in Uttar Pradesh in October: कुटुंबासह हॉलिडे प्लॅन करताय? ऑक्टोबरमध्ये उत्तर प्रदेशातील या ५ ठिकाणी होईल प्रवास अविस्मरणीय
भारत देशातील उत्तर प्रदेश हे राज्य केवळ देशातच नव्हे, तर जगात त्याच्या महान इतिहासामुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा वारसा या भूमीत जपलेला आहे. भगवान श्रीकृष्ण, अयोध्यापती श्रीराम आणि गौतम बुद्ध यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची ही जन्मभूमी मानली जाते. आजही या भूमीत प्राचीन संस्कृती, हजारो मंदिरे आणि मुघल शासकांच्या ऐतिहासिक राजवटीच्या अनेक आठवणी आणि वारसा पाहायला मिळतो.
तुम्हीही जर मित्र-परिवार किंवा कुटुंबासोबत उत्तर प्रदेशाचा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ऑक्टोबर महिना यासाठी सर्वोत्तम आहे. ऑक्टोबरच्या आल्हाददायक वातावरणात उत्तर प्रदेशातील कोणती ठिकाणे फिरण्यासाठी उत्तम आहेत, हे जाणून घेऊया.