
खेळातून अर्थार्जन हा नवीन मार्ग; परदेशगमनाचे बदलते आयाम
नागपूर : आतापर्यंत केवळ शिक्षण किंवा नोकरीनिमित्त विदेशात जाणारे लोक होते. परंतु, आता परदेशी जाण्याचे आयाम बदलत चालले आहेत. आता शिक्षणाच्या बरोबरीनेच खेळाचे महत्त्व वाढीला लागले आणि परदेशी जाण्याचे कारण बदलू लागले. शिक्षणासोबत खेळायला जाणे आणि खेळात भविष्य घडवायला जाणे, हा नवीनच आयाम आता परदेशगमनाला जोडला जात आहे.
भारतावर इंग्रजांचे राज्य असूनही भारतीयांना विलायतेला जाऊन शिक्षण घेणे कमीपणाचे वाटत नसे. तिकडची शिक्षण पद्धती खूप वेगळी होती. इंग्रजीचे एकप्रकारचे आकर्षणच होते. त्या आकर्षणामुळे बरेच भारतीय तिकडून शिकून येत व भारतात वकिली करीत होते. परंतु, परदेशात स्थायिक होत नव्हते. पुढे परदेशात शिक्षण घेणे आणि तिकडे काही वर्षे नोकरी करून अनुभव गाठीशी बांधून मायदेशात परतणे चालू झाले.
हेही वाचा: पोटदुखी, गॅस, उलट्या, आम्लपित्तावर ओवा रामबाण उपाय
परंतु, २५ ते ३० वर्षांपासून परदेशी शिक्षण, तिकडे नोकरी आणि तिकडेच स्थायिक होणे, याला स्टेट्स सिम्बॉल मानले जाऊ लागले. म्हणजेच परदेशी शिकायला गेलेला विद्यार्थी आता तिकडेच स्थायिक होणार हे जसे ठरून गेले. तिकडचा झगमगाट, भरपूर पगार, व्यक्तिस्वातंत्र्य, आधुनिक राहणीमान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिस्त, आधुनिक शिक्षण पद्धती याचा पगडा तिकडे गेलेल्या लोकांवर बसतो. आणि त्यात त्यांची काही चूक नाही.
तिकडचे वातावरणच असे आहे की एकदा तिकडे गेलेला माणूस भारतात परत येऊ शकत नाही. तुमचे देशप्रेमही त्याच्या आड येऊ शकत नाही. तिकडचे सुखासीन आयुष्य सोडून येणे कठीण होऊन जाते. आता लोक खेळात आपले भविष्य घडवायला विदेशात जात आहे. खेळात करिअर करणे हा नवीनच पैलू समोर आला आहे. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट खेळात पारंगत असाल तर त्यात परदेशात करिअर करण्यास वाव आहे, हे या निमित्ताने लक्षात येते.
भारतीयांना भयंकरच आकर्षण
भारतीयांना परदेशाचे भयंकरच आकर्षण आहे. परदेशी फिरणे, परदेशी शिक्षण घेणे आणि नोकरी करणे हा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. अगदी पूर्वीपासून भारतीय विलायतेत शिकायला जात ते बॅरिस्टर होण्यासाठी. विलायतेला जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळविणे मोठ्या मानाचे समजले जाई. ही पदवी म्हणजे शिक्षणाचा परमोच्च बिंदूच.
हेही वाचा: विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही जाणार? बीसीसीआयकडे अनेक पर्याय
मुलांसमोर नवा मार्ग
परदेशात जाऊन शिक्षण घेणे नंतर नोकरी करणे मग स्थायिक होणे हे पूर्वी विदेशात जाण्याचे कारण असायचे. आता खेळात करिअर करण्यासाठी लोक विदेशात जाऊ लागले आहेत. एवढा बदल आज झाला आहे. खेळातून अर्थार्जन हा नवीन मार्ग आता मुलांसमोर उपलब्ध झाला आहे.
Web Title: Tourism Future In Sports Earnings From Sports New Options
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..