esakal | केरळ मधील हे सण आहे प्रसिध्द; प्रत्येक सणाला आहे वेगळेपण

बोलून बातमी शोधा

केरळ मधील हे सण आहे प्रसिध्द; प्रत्येक सणाला आहे वेगळेपण

केरळ राज्य ज्याप्रमाणे सुंदर पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. 

केरळ मधील हे सण आहे प्रसिध्द; प्रत्येक सणाला आहे वेगळेपण
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः केरळ हे सुंदर किनारे, उत्कृष्ट पर्यटन आणि निर्सगाने परिपूर्ण असलेले एक राज्य आहे. केरळ संपूर्ण भारतभर एक प्रसिद्ध ठिकाण येथे लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच  केरळ राज्य सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव साजरे करण्यात देखील प्रसिध्द आहे.  

केरळ राज्य ज्याप्रमाणे सुंदर पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. इतर राज्यांतील लोकसुद्धा हे सण पाहण्यासाठी आणि त्यात सहभाग घेण्यासाठी येतात. तर चला जाणून घेवू केरळमधील काही प्रसिद्ध सणांबद्दल...

थ्रीसूर पूरम  उत्सव

केरळ राज्यात सर्वात प्रसिद्ध सण त्रिचूर पूरम उत्सव आहे. सुमारे दोनशे वर्षापासून हा उत्सवाची परंपरा आहे असून हा उत्सव प्रामुख्याने वडक्कुनाथन मंदिरात साजरा केला जातो. येथे शंकराची पूजा केली जाते.  यावेळी स्थानिक पारंपारिक वस्त्र परिधान करतात. बॅन्ड-बाजासह फटाके फोडले जातात. सुसज्ज हत्तींचा परेड आहे. येथे पर्यटक हा सण बघायला येतात.

कोडुंगल्लूर भरणी उत्सव

केरळमध्ये कोडुंगल्लूर भरणीचा उत्सव तीन दिवस चालतो. या तीन दिवसांत अनेक ठिकाणी जत्रा राहतात. हा सण भद्रकाली दारिका नावाच्या राक्षसावर विजय मिळवणीला म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्च ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या या उत्साहात स्थानिक विविध पौष्टिक पदार्थांचा नैवद्य दाखवून पुजा करतात. तसेच गटगीते तसेच नृत्य सादर करतात. 

केरळ बोट महोत्सव

केरळ बोट महोत्सव हा सवर्त्र प्रसिध्द सण आहे. या सणामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर, पूर्व इत्यादी भागातून थरारक बोटीच्या शर्यती होतात. हा उत्सव पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक केरळला प्रमुखपणे भेट देतात. बोटी दरम्यानचे गाणी आकर्षणाचे केंद्र आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान हा सण साजरा केला जातो. 

विषुव उत्सव

उत्तर भारतातील लोक पहिल्या जानेवारीला नवीन वर्ष म्हणून मानतात. नवीन वर्षाची सुरुवात विष्णू उत्सवापासून होते. ओणम उत्सवानंतर केरळने दुसर्‍या क्रमांकाचा उत्सव म्हणून घेतला आहे. या दिवशी पुरुष आणि स्त्रिया पारंपारिक कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारून नमस्कार करतात. या दिवशी घरासमोर रांगोळीही तयार केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. मुख्यतः एप्रिल महिन्यात साजरा केला जाणारा, अन्न देखील या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे.