हैद्राबादमध्ये कमी बेजटमध्ये शॅापींग करायची आहेत, तर हे आहेत बाजार

हैद्राबादमध्ये कमी बेजटमध्ये शॅापींग करायची आहेत, तर हे आहेत बाजार

जळगाव ः  हैदराबाद हे  ऐतिहासिक शहर असून येथे ऐतिहासिक स्थळ, स्थापत्य कला आणि मांसाहरी खाद्यपदार्थांसाठी  जगभर प्रसिद्ध आहे. परंतू हैदराबाद स्ट्रीट शॉपिंगसाठी देखील प्रसिध्द आहे. चला जाणून घेवू हैदराबादमध्ये कुठे आहे बाजारपेठ जाणून घेवू...

बेगम बाजार

दिडशे वर्षापासून हा बेगम बाजार असून याला हैदराबादची राजधानी म्हणतात. या बाजारात सजावट आणि घरातील सामान मिळतो. तसेच कॉस्मेटिक, परफ्युम आणि दागिने देखील खरेदी करू शकता. हैदराबाद शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. असे म्हणतात की या बाजारपेठेचा व्यापार देशभर होतो.

लाड बाजार

लाज बाजाराला बांगडी बाजार असेही म्हणतात. हा बाजार चारमीनारच्या अगदी जवळ आहे. महिला बांगड्या प्रेमीच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या बाजारात सायंकाळी भरपूर गर्दी असून येथे दागिने, रेशीम साड्या आणि परफ्यूमही खरेदी करता येतील.

मोजझम जाही मार्केट

निझाम काळापासून हा बाजार प्रसिध्द असून निझा निजाम मीर उस्मान खान यांचा मुलगा मोझम जाह यांच्या नावावर या बाजाराचे नाव पडलेले आहे. या बाजारात विविध स्टॉल्स, कोठे, कोंबडी, मांस, फळे, परफ्यूम आणि ड्राई फ्रूट्स खरेदीसाठी आहे. 

नामप्ल्ली

हैदराबादच्या नामप्ल्ली बाजार हा रस्त्यावर भरणारा बाजार आहे. तुम्हाला येथे कमी बजेटमध्ये पिशव्या, दागिने, बांगड्या, शूज, चप्पल सहज मिळतील. दर वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या बाजारात प्रदर्शन भरवले जातात. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com