Travel : आश्चर्यचकित करणारी भारतातील गावं; एकदा पहायलाच हवीत!

आज आम्ही तुम्हाला अशा गावांबद्दल सांगणार आहोत जे इतर गावांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
Travel news
Travel news
Summary

आज आम्ही तुम्हाला अशा गावांबद्दल सांगणार आहोत जे इतर गावांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

जर तुम्हाला खरोखरच भारत जाणून घ्यायचा असेल तर भारतातील प्रत्येक गावाला भेट द्यावी लागेल. पण, ते शक्य नाही. त्यामूळे भारतातील काही खास गावांना तुम्ही नक्की भेट दिली पाहीजे. तर आज आम्ही तुम्हाला अशा गावांबद्दल सांगणार आहोत जे इतर गावांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. (Most unusual villages in india Travel news)

संस्कृत बोलणारे गाव

मत्तूर हे कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील गाव आहे. कर्नाटकची राज्यभाषा कन्नड असली तरी या गावातील रहिवासी संस्कृत भाषा बोलतात. संस्कृत ही एक प्राचीन भारतीय भाषा आहे. जी आता बोलली जाणारी भाषा नाही. तरिही या गावात आजही या गावात संस्कृत बोलली जाते.

Travel news
Honeymoon : सप्टेंबरमध्ये हनीमून प्लॅनिंगसाठी देशातील बेस्ट ठिकाणं; नक्की जा!

म्यानमार आणि भारत एकाच घरात

लोंगवा गाव हे नागालँडच्या मोन जिल्ह्यात आहे. राज्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी हे एक आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या गाव प्रमुखाचे घर अंग किंवा राजा असेही म्हणतात. इथल्या प्रमुखाचे घर भारत आणि म्यानमारच्या सीमेवर आहे. जर तुम्ही त्यांच्या घरात असाल तर तुम्ही एकाच वेळी म्यानमार आणि भारतात असू शकता.

५० वर्ष लग्न न झालेलं गाव

वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, बिहारमधील बड़वां कला गावात कोँणाची तरी वरात निघाली. ५० वर्षांनंतर या गावात एक विवाह सोहळा पार पडला. २०१७ पर्यंत गावात एकही विवाह झाला नव्हता. 2017 पूर्वी, बड़वां कला गावात पोहोचण्यासाठी १० किलोमीटरचा ट्रेक करावा लागत होता. यामुळे अनेक नववधू आणि त्यांचे कुटुंबीय नाराज झाले. आणि त्यांनी या गावातील तरूणांना मुली देण्यास नकार दिला. यामुळे तब्बल ५० वर्षांनी गावकऱ्यांनी येथे डोंगर खोदुन रस्ता बनवला. ज्यामुळे पुन्हा एकदा या गावातील तरूणांचे विवाह पार पडले.

Travel news
Tourism : देशाचे ऐक्य दाखवणारे भारत मातेचे मंदिर तूम्ही पाहिले का?

दरवाजे विरहित गाव

महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव एक दरवाजे विरहित गाव म्हणूनही ओळखले जाते. येथील गावकरी हे हिंदू देवता शनिदेवाचे भक्त आहेत. घराला दरवाजे नसले तरी आजवर इथे चोरीचे प्रकार घडले नाहीत. गावातील नागरीकांना इजा पोहोचवल्यास शनिदेवाचा कोप होतो, अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com