esakal | भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घ्यायचे, तर भारतातील या ठिकाणांना भेटी द्यायला हवे
sakal

बोलून बातमी शोधा

Buddhist Tourist Places In India

बौद्धधर्मियांसाठी सर्वांत पवित्रस्थळ म्हणजे बोधगया. या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्त झाली होती. अंतिमतः हे ठिकाण पवित्र आहे. आजही बोधीवृक्ष मंदिर प्रांगणात आहे. मात्र ते चौथ्या पिढीतील आहे.

भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घ्यायचे, तर भारतातील या ठिकाणांना भेटी द्यायला हवे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - गौतम बुद्ध यांचा जन्म शुद्धोधनाच्या घरी इसवी सन पूर्व 563 मध्ये झाले होते. त्यांच्या मातोश्रीचे नाव महामाया असे होते. बुद्धांच्या जन्माच्या केवळ सात दिवसानंतर आईचा मृत्यू झाला. या नंतर मावशी महाप्रजापती  गौतमीने त्यांचे पालनपोषण केले. लहानपणापासूनच बुद्ध आध्यत्मिकप्रवृत्तीचे होते. यामुळे 30 व्या वर्षी गौतम बुद्ध संन्याशी बनले.

अनेक वर्षांची तपस्येनंतर गौतम बुद्धांना बोधगयामध्ये बोधिवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली. तेव्हापासून लोकांनी त्यांना भगवान बुद्ध असे संबोधनाला सुरूवात केले. त्या काळी बौद्ध धर्म केवळ भारत आणि नेपाळपर्यंत मर्यादित होते. मात्र सम्राट अशोकने बौद्ध धर्माची पूर्ण जगात प्रसार करण्याचा प्रयत्न केला. आधुनिक काळात न केवळ भारत किंवा नेपाळ, परंतु आशियासह जगभरात भगवान बुद्धाची पूजा, उपासना केली जाते. यासाठी बिहारमधील बोधगयात येऊन लोक दर्शन घेतात. जर तुमचे धार्मिक पर्यटनाला जायचे ठरले असेल. देशातील भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घ्यायचे, तर भारतातील या ठिकाणांना भेटी द्यायला हवे

बोधगया, बिहार
बौद्ध धर्मीय लोकांचे सर्वांत पवित्र स्थळ बोधगया आहे. येथे बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली होती. तुम्ही भगवान बुद्धाचे आशीर्वाद घेऊ शकता.

सारनाथ मंदिर, वाराणसी
या ठिकाणी भगवान बुद्धाने पहिल्यांदा उपदेश केले होते. त्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी हे पवित्र स्थळ आहे. येथील मंदिराची बांधणी सम्राट अशोकाने केली होती. येथे चौखंडी स्तूप, कुटी विहार, धमेख स्तूप आणि धर्मराजिका स्तूपही आहे.

महापरिनिर्वाण मंदिर, कुशीनगर
उत्तर प्रदेशातील कुशीनगरात महापरिनिर्वाण मंदिर आहे. मंदिरात बुद्धांची सहा फुट उंच मूर्ती आहे. हे मंदिर देश-विदेशातील भाविकांसाठी पवित्र स्थळ आहे. कारण कुशीनगरमध्ये गौतम बुद्ध पंचतत्त्वात विलीन झाले. भगवान बुद्धांचे शिष्य स्वामी हरिबलाने लाल दगडाने भव्य मंदिराची उभारणी केली.

Edited - Ganesh Pitekar

loading image