esakal | महाबळेश्वरातील 22 गावांसह किल्ले प्रतापगडावरील 'पर्यटन' सुरू होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Pratapgad Fort

आंबेनळी घाटातील वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने कंबर कसली आहे.

महाबळेश्वरातील 22 गावांसह किल्ले प्रतापगडावरील 'पर्यटन' सुरू होणार!

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : आंबेनळी घाटातील (Ambenali Ghat) वाहतूक गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav 2021) सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने (Public construction Department) कंबर कसली असून, घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता काँक्रिट टाकण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार दिवसांत महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील (Mahabaleshwar-Poladpur Road) वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटातील रस्ता तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्या होत्या. २१ जुलैपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेले दीड महिना ही वाहतूक बंद आहे. वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. केवळ दीड महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवसांत या मागार्वरील वाहतूक सुरू होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: 'कास'वर पर्यटकांचा ओघ वाढला; सलग सुट्ट्यांमुळे पठारावर मोठी गर्दी

या मार्गावरील वाहतूक सुरू होताच किल्ले प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायथ्याला असलेली २२ गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहेत. आंबेनळी घाटातून वाहतूक सुरू होताच किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार आता थांबणार आहे. वाई येथून आंबेनळी घाट मार्गे कोकणात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जातो. ती वाहतूक गेली दीड महिना बंद पडली होती. आता ही वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.

loading image
go to top