मनालीला फिरायला जायचा प्लॅन आहे? मग, 'या' ठिकाणांना जरुर भेट द्या

Manali Tourist Places
Manali Tourist Placesesakal
Updated on

मनाली : ज्या लोकांना प्रवास करण्याची आवड आहे, त्यांना कोणत्या ठिकाणी जायला आवडेल असे विचारल्यास? बहुतेक लोक पर्वतांनाच (Mountain) पसंती दर्शवतील. वास्तविक पर्वतावरील वातावरण, तिथली आश्चर्यकारक दृश्ये, शांतता, तलाव-धबधबे सर्वांनाच भुरळ घालत असतात. अशा स्थितीत, लोक डोंगरावर फिरण्याची योजना देखील नक्कीच आखतात, कारण त्यात त्यांना खूप आनंद मिळतो. दरवर्षी पर्यटक (Tourists) मोठ्या संख्येनं डोंगरांकडेच वळत असतात आणि तिथल्या पर्यटनाचा आनंद घेतात. जर तुम्ही देखील डोंगरांवर फिरायचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही हिमाचल प्रदेशात असलेल्या मनालीला जरुर जाऊ शकता. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. (Tourist Guide Manali Tourist Places These Four Places To Visit in Manali Are The Best)

Summary

ज्या लोकांना प्रवास करण्याची आवड आहे, त्यांना कोणत्या ठिकाणी जायला आवडेल असे विचारल्यास? बहुतेक लोक पर्वतांनाच पसंती दर्शवतील.

जोगिनी वॉटर फॉल्स (Jogini Waterfall) : जोगिनी वॉटर फॉल्स हा नैसर्गिक पाण्याचा धबधबा आहे. इथले पाणी बर्‍यापैकी थंडच असते. या ठिकाणी पर्यटकांची देखील मोठी वर्दळ पहायला मिळते. आपण येथून पर्वत आणि इथल्या अनेक सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. मनाली हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असल्याने पर्यटक इथे येण्यास खूपच उत्सुक असतात.

Jogini Waterfall
Jogini Waterfall

रोहतांग पास (Rohtang Pass) : जर तुम्ही मनालीला जात असाल, तर मनालीपासून सुमारे 50 किलो मीटर अंतरावरील प्रवास करून तुम्ही रोहतांग खोऱ्यात पोहचू शकता. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 4111 किमी उंचीवर आहे. येथून तुम्हाला पर्वत आणि हिमनद्यांची सुंदर दृश्ये देखील पहायला मिळतील. याशिवाय येथे माउंटन बाइकिंग, पॅराग्लाइडिंग आणि ट्रेकिंग असे साहस खेळ देखील तुम्ही खेळू शकता.

Rohtang Pass
Rohtang Pass

ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क (Great Himalayan National Park) : कुल्लूचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे, ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान. हे पार्क 50 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. येथे आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती आणि बऱ्याच प्रकारचे पक्षी पहायला मिळतील. इथले हवामान बर्‍यापैकी आनंददायी असून नेहमीच येथे शांतता पहायला मिळते. येथे जाऊन तुम्ही निसर्गाला अगदी जवळून पाहू शकता.

Great Himalayan National Park
Great Himalayan National Park

सोलांग व्हॅली (Solang Valley) : सोलांग व्हॅलीला भेट देऊन तुमचे मन आनंदित होईल याची खात्री आहे. येथे दरवर्षी हिवाळ्यात हिवाळी महोत्सव देखील आयोजित केला जातो. पॅराग्लाइडिंग व्यतिरिक्त आपण येथे घोडेस्वारी देखील करू शकता. जर आपण निसर्गप्रेमी असाल, तर आपल्याला निसर्गाची अनेक आश्चर्यकारक दृश्ये येथे पहायला मिळतील. मनाली ते सोलंग खोऱ्याचे अंतर सुमारे 12 कि.मी. आहे, जे तुम्ही अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात व्यापू शकता.

Tourist Guide Manali Tourist Places These Four Places To Visit in Manali Are The Best

Solang Valley
Solang Valley

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com