esakal | फिरायला जायचा प्लॅन आहे? 'या' ठिकाणांना आवर्जुन भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Uttarakhand

फिरायला जायला कोणाला आवडणार नाही? काहीजण त्यांच्या मित्रांसमवेत जातात, तर काही त्यांच्या साथीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

फिरायला जायचा प्लॅन आहे? 'या' ठिकाणांना आवर्जुन भेट द्या

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

फिरायला जायला कोणाला आवडणार नाही? काहीजण त्यांच्या मित्रांसमवेत जातात, तर काही त्यांच्या साथीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक भारतातील सर्व पर्यटनस्थळांवर पोहोचलेले दिसतील. मात्र, सध्या कोरोना महामारीमुळे पर्यटक कोठेही बाहेर जाऊ शकले नाहीत. परंतु, देशात लाॅकडाउन (Coronavirus Lockdown) शिथिल करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केल्याने पुन्हा लोक फिरायला बाहेर पडत आहेत. काहीजण हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) सुंदर ठिकाणी, तर काही उत्तराखंडच्या (Uttarakhand) मैदानावर जात आहेत. प्रत्येकजण त्यांच्या स्वत: च्या मार्गाने प्रवास करण्याची योजना आखत आहे. अशा स्थितीत, आपण देखील आपल्या मित्रांसह फिरायला जाण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही आपल्याला अशी सुंदर ठिकाणं सांगू, जिथे आपण पर्यटनाचा खूप आनंद घेऊ शकता. चला तर, या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.. (Tourist Guide These 3 Places To Visit In India With Partner Or Friends Are The Best bam92)

नैनीताल (Nainital Lake) : उत्तराखंडच्या कुमाऊं प्रदेशात वसलेला 'नैनीताल' आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. केवळ देशातूनच नाही, तर परदेशातूनही बरेच पर्यटक येथे भेट देतात आणि इथल्या पर्यटनाचा आनंद घेतात. नैनी तलाव, ज्योलिकोट, स्नो व्यू पॉइंट अशी बरीच पर्यटन स्थळे इथे आपल्याला पहायला मिळतील. येथे प्राचीन मंदिरेही मोठ्या प्रमाणात दिसतील.

Nainital Lake

Nainital Lake

मनाली (Manali) : मनाली शिमल्याच्या काहीच अंतरावर असून हे थंड ठिकाण आहे. 'हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने', हे गाणं परफेक्ट लागू होतं ते हिमाचल प्रदेशसाठी.. हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली, शिमला, डलहौसी आणि धरमशाला इत्यादी ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीने खूपच फेमस आहेत.

पर्यटन स्थळे :

 • मनु मंदिर

 • जोगिनी वॉटर फॉल्स

 • रोहतांग पास

 • सोलांग व्हॅली

 • मणिकरण गुरुद्वारा

 • नगर वाडा

 • ग्रेट हिमालयन नेशनल पार्क

Manali

Manali

शिमला (Shimla) : भारतातील हिमाचल प्रदेश हे राज्य 'देवभूमी' म्हणूनही ओळखले जाते. शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी असून उत्तर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून २२०० मीटर उंचीवर वसलेले शिमला भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते.

पर्यटन स्थळे :

 • मॉल रोड शिमला

 • क्राइस्ट चर्च

 • जाखू मंदिर

 • कुफरी

 • चैल

 • नारकंडा

 • ताता पाणी

Tourist Guide These 3 Places To Visit In India With Partner Or Friends Are The Best bam92

Shimla

Shimla

loading image