Tourism : महिलांनो तुम्हाला एकट्याला फिरायचं असल्यास 'या' ठिकाणांना भेट द्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism news

Tourism : महिलांनो तुम्हाला एकट्याला फिरायचं असल्यास 'या' ठिकाणांना भेट द्या...

महिलांना एकट्याला बाहेर फिरण्यासाठी बऱ्याचवेळा घरातून नकार दिला जातो. मात्र आपल्या देशात अशी काही ठिकाणे आहेत जी, महिलांना एकट्याला फिरण्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्याठिकाणी तुम्ही फिरु शकता. ही ठिकाणे संरक्षित असून येथे पर्यटनाचा आनंदही घेऊ शकता.

उत्तराखंड

उत्तराखंडच्या कुशीत वसलेलं नैनिताल हे शहर महिलांना फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात महिलांना एकट्याने प्रवास करण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.

म्हैसूर

स्ट्रीट मार्केट आणि समृद्ध संस्कृती आणि नाइटलाइफ साठी म्हैसूर हे एक प्रसिद्ध शहर आहे. या ठिकाणची खाद्यसंस्कृती लोकांना भुरळ पाडते. काही महिलांना ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याचा छंद असतो. अशा अनेक महिला या प्रेदशातील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतात.

हेही वाचा: दिल्लीपासून 7 तासांच्या अंतरावर असलेल्या लॅन्सडाउन हिल स्टेशनला भेट द्यायचीये? जाणून घ्या सोपा मार्ग

शिमला

महिलांसाठी शिमला हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. महिला प्रवाशांसाठी हा एक सुरक्षित प्रदेश असून येथे महिला बिनधास्त पर्यटन करु शकतात. टेकड्या, बर्फ, पाईन वृक्ष अशी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात.

काझीरंगा

काही महिलांना जंगल सवारीची आवड किंवा प्राणी प्रेमी असतील तर त्यांच्यासाठी काझीरंगा ठिकाणी बेस्ट ठरणार आहे. येथील नॅशनल पार्क महिला एकट्या प्रवासासाठीही उत्तम आहे.

पॉंडिचेरी

पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि फ्रेंच शैलीतील व्हिलामध्ये तुम्ही आरामात राहू शकता. पॉंडिचेरी हे ठिकाण महिलांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे या परिसरात महिला निवांत फिरु शकतात.

हेही वाचा: YouTube वर व्हिडिओ पाहताना जाहिरात तुम्हाला त्रास देणार नाही; 'ही' सोपी ट्रिक वापरा

सिक्कीम

सिक्कीममधील मठ आणि उंच पर्वत अनुभवण्यासाठी महिला प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवासाची ठिकाणे आहेत. सिक्कीम हे एक सुप्रसिद्ध ठिकाण असून इथे महिला भेट देऊ शकतात.

Web Title: Tourist Place For Women Solo Travel Best Place

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..