दिल्लीपासून 7 तासांच्या अंतरावर असलेल्या लॅन्सडाउन हिल स्टेशनला भेट द्यायचीये? जाणून घ्या सोपा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीपासून 7 तासांच्या अंतरावर असलेल्या लॅन्सडाउन हिल स्टेशनला भेट द्यायचीये? जाणून घ्या सोपा मार्ग

दिल्लीहून या ठिकाणी पोहोचण्यासाठी केवळ 6 ते 7 तास लागतात.

दिल्लीपासून 7 तासांच्या अंतरावर असलेल्या लॅन्सडाउन हिल स्टेशनला भेट द्यायचीये? जाणून घ्या सोपा मार्ग

उत्तराखंडमध्ये भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही तुमचे मित्रपरिवार, पार्टनर किंवा कुटुंबासह भेट देऊ शकता. दिल्लीहून येणाऱ्या लोकांसाठी उत्तराखंड येथील सुंदर, छोटे शहर लॅन्सडाउन तुलनेत अगदी जवळ आहे. दिल्लीहून या ठिकाणी पोहोचण्यासाठी केवळ 6 ते 7 तास लागतात.

अनेक लोकांना या ठिकाणाबद्दल माहिती आहे. परंतु अनेकांना या ठिकाणी कसे पोहोचायचे हे माहित नाही. जर तुम्ही वीकेंडसाठी या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर लॅन्सडाउनला पोहोचण्याचा हा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. जाण्याआधी तुम्ही असा प्लॅन केला तर सहजरित्या या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.

विमान प्रवास

हिरवाईने नटलेला डोंगर आणि उंचावरून कोसळणारे सुंदर नजारे पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. दरम्यान, येथील जॉली ग्रँट विमानतळ, डेहराडून हे येथून ते दिल्लीपर्यंतचे अंतर सुमारे १५२ किमीवर आहे. लॅन्सडाउनला पोहचण्यासाठी हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. दिल्ली ते डेहराडून हा प्रवास करण्यासाठी रोज फ्लाईट आहेत आणि त्याही बजेटमध्ये. याशिवाय विमानतळावरून कॅब, कार, बसनेही तुम्ही जाऊ शकता.

रेल्वे

जर तुम्ही ट्रेनने लॅन्सडाउनला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कोटद्वारला पोहोचाल. लॅन्सडाउनला जाण्यासाठी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कोटद्वारासाठी रात्री उशिरा एक रेल्वे सुटते आणि सकाळी लवकर पोहोचते. कोटद्वारापासून लॅन्सडाउन 40 किमी अंतरावर आहे आणि कोटद्वार ते लॅन्सडाउन वाहतूक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.

दिल्ली ते लॅन्सडाउन प्रवास बाय रोड

दिल्ली ते लॅन्सडाउन अंतर 260 किमी आहे. बहुतेक लोक फ्लाइट किंवा ट्रेन निवडण्याऐवजी दिल्ली ते लॅन्सडाउन रोड ट्रिपला प्राधान्य देतात. दिल्लीहून लॅन्सडाउनला जाणारा सर्वात छोटा मार्ग म्हणजे गाझियाबाद-मोरादानगर मार्गे लॅन्सडाउनला पोहोचणे असा आहे.

सर्वोत्तम पर्याय काय आहे?

दिल्लीहून लॅन्सडाउनला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटचा विचार केला पाहिजे. कमी बजेटचा प्रवास असेल तर ट्रेन हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय, जर बजेटचं कोणतंही टेन्शन नसेल, तर मात्र तुम्ही फ्लाइट, कार किंवा व्होल्वो बसनेही या ठिकाणापर्यंत प्रवास करु शकता.