Dapoli Tourism : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती; पावसामुळं पर्यटकांचा फसला बेत, दापोलीतील पर्यटक माघारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली.
Dapoli Ratnagiri Tourists
Dapoli Ratnagiri Touristsesakal
Summary

गेल्या पाच दिवसांच्या सुटीमध्ये अतिवृष्टीमुळे पर्यटकांना मज्जा करता आली नाही.

हर्णै : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मासळीही नाही आणि अतिवृष्टीमुळे पर्यटकांच्या (Tourists) आनंदाचा बेतही फसला. बहुतांशी पर्यटक न थांबता दुसऱ्या दिवशी परत माघारी फिरले.

Dapoli Ratnagiri Tourists
Konkan Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ खवळलं! केरळ, गोव्यासह राज्याच्या किनारी भागात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

त्यामुळे वादळी परिस्थितीमुळे पर्यटक हिरमुसले होऊन परतल्याने त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायालाही बसला. सलग सुटी असली की दापोली तालुक्यात पर्यटकांची गर्दी होते. अनंत चतुर्दशीला जोडून पुढे रविवार, सोमवारही सुटी आल्याने हजारो पर्यटकांनी दापोलीत हजेरी लावली.

दापोली तालुक्याची किनारपट्टीला व किनाऱ्यावर असलेली रिसॉर्ट पर्यटकांनी फुल्ल होती. किनाऱ्यावर मज्जा करणे, समुद्रात पोहण्याचा आनंद लुटणे, वॉटरस्पोर्टस्‌वर मज्जा करणे आदी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बहुसंख्येने येतात. दापोली तालुक्यात आलेला पर्यटक हर्णै बंदरातील ताजी मासळी खायला कधीच चुकत नाही. गेले दोन-तीन दिवस बंदरात मासळी खरेदीसाठी (Fish Market) गर्दी होती.

Dapoli Ratnagiri Tourists
Navratri Festival : कोलकत्याच्या गंगा नदीतलं पाणी अन् मातीनं कोल्हापुरात साजरी होते 'नवरात्र'

पर्यटकांच्या आगमनामुळे व्यावसायिक आनंदित असतानाच गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने पर्यटकांसह व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण पडले. तीन दिवस पडलेल्या पावसाने पर्यटकांना मज्जाच करता आली नाही. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. केळशी, मुरूड गावांतील अंतर्गत रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. समुद्राला आलेल्या प्रचंड उधाणामुळे पाणी वाढले होते.

समुद्रही खवळला होता. भरतीच्या पाण्याने संपूर्ण किनारपट्टी वेढली गेली होती. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व उद्योग, वॉटरस्पोर्टस्‌ बंदच होते. त्यामुळे पर्यटकांना समुद्रस्नानाचादेखील आनंद घेता आला नाही. त्यामुळे जे पर्यटक रिसॉर्टला उतरले होते ते तेथून बाहेरच पडले नाहीत. दोन दिवसांचा पावसाचा इशारा समजल्यानंतर पर्यटकांनी दुसऱ्या दिवशीच चेकआऊट केले आणि परतीचा प्रवास करणे पसंत केले.

गणेशोत्सवाआधी दोन दिवस हर्णै बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला होता. त्यामुळे मासेमारी सुरू झाली नव्हती. त्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी आणि वादळामुळे मच्छीमारांना घरीच बसावे लागले. त्यामुळे पर्यटकांना ताजी मासळीही मिळाली नाही. पावसामुळे आधीच निराश झालेले पर्यटक मासळी नसल्याने आणखीनच नाराज झाले.

Dapoli Ratnagiri Tourists
Ratnagiri Rain : गेल्या 50 वर्षांत प्रथमच 'या' गावात मोठा पाऊस; ढगफुटीसदृशस्थिती, जनजीवन विस्कळीत

चिमणी बाजारातील काही विक्रेत्या महिलांनी साठवून ठेवलेली मासळी पर्यटकांना मिळाली. या सुट्या पर्यटकांच्यादृष्टीने फुकट गेल्याच तसेच मासळी उद्योग आणि पर्यटन उद्योगाचेही प्रचंड नुकसान झाले. आज सकाळी पागवून मिळालेली थोडीफार मासळी बंदरात विकण्यासाठी चिमणी बाजारात आली होती; परंतु ही मासळी खूपच महाग असल्याने पर्यटकांची निराशा झाली.

Dapoli Ratnagiri Tourists
Udayanraje Bhosale : 'शंभूराज देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची, कोणी चोरली का बघा..'; असं का म्हणाले उदयनराजे?

गेल्या पाच दिवसांच्या सुटीमध्ये अतिवृष्टीमुळे पर्यटकांना मज्जा करता आली नाही. बोटिंग, वॉटरस्पोर्टस्‌चा आनंद घेता आला नाही. किनाऱ्यावरही पर्यटकांना फिरता आले नाही. तसेच मासेमारी बंद असल्याने ताजी मासळी मिळाली नाही. त्यामुळे पर्यटक पाच दिवसांची सुटी असूनही दोन दिवसांत परत गेले. यामुळे पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले.

-धीरज बागकर, पर्यटन व्यावसायिक, सालदुरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com