Udayanraje Bhosale : 'शंभूराज देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची, कोणी चोरली का बघा..'; असं का म्हणाले उदयनराजे?

मुंबईत गेल्यावर मी ही चप्पल बदलणार असल्याचे देसाईंनी सांगितले.
Shambhuraj Desai Udayanraje Bhosale
Shambhuraj Desai Udayanraje Bhosaleesakal
Summary

शंभूराज यांनी उदयनराजेंना मुजरा करत त्यांचा निरोप घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

सातारा : जलमंदिर निवासस्थानी भेटीसाठी आलेले पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे परत जाताना अरे देसाई साहेबांची चप्पल कोणी चोरली का बघा, असे खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) मिश्किलपणे म्हणाले.

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale
Shrikant Shinde : 'एक बार जो हमने कमिटमेंट कर दी, तो हम किसी की भी नही सुनते..'; खासदार शिंदेंचा ठाकरेंना टोला

त्यावर मंत्री देसाईंनी चप्पल घालतच माझी चप्पल साडेतीनशे रुपयांची असून, ती खेड शिवापूर येथून घेतली आहे. मुंबईत गेल्यावर बदलणार असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पालकमंत्री देसाई यांनी काल (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace) या निवासस्थानी भेट घेतली.

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale
Eid-e-Milad : शिमोगात 'ईद-ए-मिलाद'च्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक; 40 जण ताब्यात, तब्बल अडीच हजार पोलिस तैनात

या वेळी दोन्ही नेत्यांत अर्धा तास विविध विषयांवर जिल्ह्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. परत माघारी जाताना उदयनराजेंनी अरे.. देसाईसाहेबांची चप्पल कोणी चोरली का बघा, यावर देसाई यांनी माझी चप्पल साडेतीनशे रुपयांची असून, ती खेड शिवापूर येथून घेतली आहे, असे आवर्जून उदयनराजेंना सांगितले.

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale
Ajinkyatara Fort : शिराळ्यातील मुलाची अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या; कुरणेश्वर मंदिराजवळ आढळला मृतदेह

मुंबईत गेल्यावर मी ही चप्पल बदलणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मंत्री देसाई त्यांच्या शासकीय गाडीत बसण्यास निघाले, त्यापूर्वीच खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. या वेळी शंभूराज यांनी उदयनराजेंना मुजरा करत त्यांचा निरोप घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com