

Tourists Falls in Love With Scenic View of Kashmir's Ladha Dhar
sakal
Remote Kashmir Tourist Destinations: सध्या काश्मीर खोऱ्याला ऐन हिवाळ्यात जणू हिमचादरीने लपेटले आहे. उधमपूर जिल्ह्यातील चेनानी परिसरातील लढाधार हे निसर्गरम्य स्थळ गर्दीच्या पर्यटन केंद्रांपासून दूर 'शुद्ध पांढन्या सोन्या'चा (नितळ बर्फाचा) शोघ घेणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी अव्वल पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय होत आहे. पर्यटकांची मोठी गदीं नसल्याने येथील हिमाच्छादन अत्यंत नितळ, प्रदूषणमुक्त स्वरूपात आजही टिकून आहे. त्यामुळेच तुलनेने प्रसिद्ध व व्यावसायिकीकरण झालेल्या पर्वत उतारांवरील पर्यटनस्थळांच्या तुलनेने लढाधारचे सौंदर्य अधिक अधोरेखित होते.