
The Unforgettable Journey
Sakal
Ticketless travel : मी, माझे पती व माझा साडेचार वर्षाचा मुलगा अक्षय आम्ही एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी अकोला इथं जाण्यासाठी दादरहून विदर्भ एक्स्प्रेसनं प्रवास करत होतो. लहान असल्यानं ट्रेनमध्ये अक्षयची दंगामस्ती चालू होती. सीटवर चढणं उतरणं, उड्या मारणं चालू होतं. थोड्या वेळानं तिकीट तपासनीस आले.