October Heat Travel Guide: ‘ऑक्टोबर हीट’ जवळ येत आहे आणि पर्यटनाचे बेतही सुरू झाले आहेत. मात्र, या काळात सफर करताना आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यासाठी काही सोपे कानमंत्र बघूया..कानमंत्रहायड्रेटेड राहापुरेसे पाणी प्या : डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) टाळण्यासाठी दिवसभर थोडथोड्यावेळाने पाणी पित रहा. तहान लागली की पाणी प्यायचे, अशी वाट बघू नका.ओआरएस किंवा लिंबू सरबत : घामामुळे शरीरातून मिनरल्स बाहेर जातात. त्याची भरपाई करण्यासाठी ओआरएसचे द्रावण, लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी अशी पेये प्या..Sleep Tourism Destinations: फिरा… पण झोपेसाठी! जाणून घ्या भारतातील 5 सुंदर 'स्लीप टुरिझम' डेस्टिनेशन्स .योग्य कपडे निवडाफिकट रंग आणि सैल कपडे : गडद रंग उष्णता शोषून घेतात, तर हलके किंवा फिकट रंग (पांढरा, निळा, पिवळा) ते परावर्तित करतात. सैल कपडे घामाचे बाष्पीभवन सहज होऊ देतात आणि शरीर थंड ठेवतात.सुती किंवा लिनन फॅब्रिक : सिंथेटिक कपड्यांऐवजी सछिद्र असलेले सुती किंवा लिननचे कपडे परिधान करा.डोके झाकणे : सूर्यप्रकाशातून थेट डोके वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा.डोळ्यांसाठी : UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा..वेळेचे व्यवस्थापन करादुपारचा प्रवास टाळा : दिवसाच्या सर्वात उष्ण तासांमध्ये (साधारणपणे सकाळी ११ ते दुपारी ३) बाहेर फिरणे टाळा.सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फिरा : सकाळी लवकर आणि संध्याकाळ हे फिरण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. हवामान थोडे शीतल असते..जेवणात हलकेपणा ठेवाजड, चरबीयुक्त अन्न टाळा : जड आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि आळस येऊ शकतो.हलके आणि ओले पदार्थ खा : w, दही, सांजा, कोशिंबीर असे हलके पदार्थ खा. त्यामुळे पचन सोपे येईल आणि शरीरात पाण्याचे प्रमाणही राहील..Youth Mental Health Crisis: तरुणांमध्ये वाढतेय मानसिक आजारांचे प्रमाण; चिंताजनक अहवाल आला समोर .लक्षणे ओळखाउष्णतेचा थकवा (Heat Exhaustion) : जास्त घाम येणे, कमजोरी वाटणे, मळमळ, डोकेदुखी.उष्णतेचा झटका (Heat Stroke) : शरीराचे तापमान खूप वाढणे, कोरडी आणि लालसर त्वचा, नाडीची गती वाढलेली आणि जोरजोरात धडधडणे, गोंधळ, भ्रम किंवा बेशुद्ध होणे. ही लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या..इतर सूचनाफर्स्ट एड किट : प्रवासात नेहमीच फर्स्ट एड किट बरोबर ठेवा. त्यात ORS पाकिट, डिहायड्रेशनवरील आणि इतर आवश्यक औषधे ठेवा.सनस्क्रीन आहे गरजेचे : बाहेर निघण्याच्या वीस-तीस मिनिटांआधी उघड्या अवयवांवर (चेहरा, हात, पाय) चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.