Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

लिटल डायोमेड आयलंड हे जगातील एकमेव असं ठिकाण आहे जिथं हेलिकॉप्टरद्वारे अन्न पोहोचवलं जातं
Travel Tips
Travel Tipsesakal

Travel Tips : लिटल डायोमेड आयलंड हे जगातील एकमेव असं ठिकाण आहे जिथं हेलिकॉप्टरद्वारे अन्न पोहोचवलं जातं. इथं तुम्हाला फक्त निवडक लोकच दिसतील. इथे ना बँक आहे ना रेस्टॉरंट. हे बेट अमेरिकेचा एक भाग आहे. अमेरिकेतील लिटल डायोमेड बेटाचा समावेश सर्वात निर्जन बेटांमध्ये होतो. इथं रस्ते नाहीत, बँका किंवा रेस्टॉरंट नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टरद्वारे या बेटावर खाण्यापिण्याच्या वस्तू पोहोचवल्या जातात. या बेटापासून रशिया केवळ तीन किलोमीटर अंतरावर असल्याच सांगितलं जातं.

Travel Tips
Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

या बेटावर फक्त 80 लोक राहतात. लिटल डायोमेड बेट हे अमेरिकेतील निर्जन बेट आहे. हे सुमारे 8 चौरस किलोमीटरमध्ये पसरलं आहे. इथं अनेक धोकादायक प्राणी आढळतात. या बेटावर 144 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतात. हिवाळ्याच्या दिवसांत इथलं किमान तापमान -14 अंशांपर्यंत पोहोचते.

Travel Tips
Winter Outfit : तुम्ही सुद्धा बनू शकता किंग खान, पहा शाहरुखच्या विंटर आउटफिट टिप्स

बेटाच्या इमारती 1970 ते 1980 या काळात बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये शाळा आणि वाचनालयाचा समावेश आहे. बेटावरील शाळेत एकमेव वायफाय आहे.दर आठवड्याला त्यांना लागणाऱ्या वस्तू हेलिकॉप्टरद्वारे किंवा जहाजाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इथं डिशवॉशिंग साबण सुद्धा 3500 रुपयांना मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com