Winter Outfit : तुम्ही सुद्धा बनू शकता किंग खान, पहा शाहरुखच्या विंटर आउटफिट टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Outfit

Winter Outfit : तुम्ही सुद्धा बनू शकता किंग खान, पहा शाहरुखच्या विंटर आउटफिट टिप्स

Winter Outfit : शाहरुख खान म्हणजे बॉलिवूडचा 'किंग खान'. अभिनयासोबतच शाहरुख खान त्याच्या स्टाईल आणि लुक्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. आता थंडी वाढली आहे, यात मुलींचे विंटर स्टाईल कपडे त्यांचे लूक्स अशा बातम्या खूप वाचायला मिळतात, पण पुरुषांसाठी पण असेच हटके लूक्स असले पाहिजेत. आणि किंग खानची स्टाईल कोणाला नाही आवडत? तर आज बघुया, शाहरुख खानचे विंटर स्टाईल आऊटफिट्स.

हेही वाचा: Bajari Thalipeeth Recipe: बाजरीचे थालीपीठ

शाहरुख खानचा एकंदरीत ब्लॅक लूक खूप खास आहे. या लूकमध्ये किंग खान खूपच स्टायलिश दिसतो. काळ्या जॅकेटसोबत त्याने हातमोजे आणि सनग्लासेस घातले आहेत.ग्रे मफलर आणि ब्राउन स्वेटर घातलेल्या डेनिम जीन्समध्ये शाहरुख खान खूपच स्टायलिश दिसतो. शाहरुख खानने हा लूक कॅरी करण्यासाठी ब्लॅक सनग्लासेस लावले आहेत.

हेही वाचा: Heart Attack in Winter: थंडीत बरेच जण अंघोळीच्या वेळी करताय 'ही' एक चूक, वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

'मोहब्बतें' चित्रपटातील या सीन मध्ये शाहरुख व्हायोलिन वाजवताना दिसतोय. त्याच्या आऊटफिटवर एक नजर टाकली तर त्याने पाठीवर आकाशी निळ्या रंगाचा स्वेटर टाकलाय. हलक्या राखाडी रंगाच्या त्याच्या मॅचिंग आऊटफिटवर निळा स्वेटर छान उठून दिसत आहे.

हेही वाचा: Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

या लूकमध्ये शाहरुख खान खूपच सिंपल आणि सोबर दिसतोय. त्याने हलक्या तपकिरी रंगाचा ट्रेंच कोट आणि मल्टी कलर मफलर कॅरी केला आहे. डेनिम जीन्समधला शाहरुख खानचा हा लूक आजही लोकांचा फेव्हरेट आहे.