Foreign Tour करायचीय, मग या देशांमध्ये बिना व्हिसा फिरू शकतात भारतीय, मग कधी करताय प्लॅन?

Foreign Tour Without Visa: जवळपास ६० देशांमध्ये जाणासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता भासत नाही. या देशांमध्ये भारतीय साधारण एक महिना ते तीन महिने राहू शकतात आणि पर्यटक म्हणून फिरू शकता
Foreign Tour Without Visa
Foreign Tour Without VisaEsakal

Foreign Tour Without Visa: फॉरेन टूर म्हणजेच परदेशात फिरण्याचं Foreign Tour प्रत्येकाचंच स्वप्न असतं. एकदा तरी विदेशात जावं असं अनेकांना वाटतं तर काहींना आपण वेगवेगळ्या देशात जाऊन तिथली संस्कृती Culture पहावी, वेगवेगेळी ठिकाणं पाहावी, तिथले पदार्थ चाखावे असे अनेकांना वाटतं. Travel Tips Marathi You can travel these countries without Visa

मात्र काही वेळा प्रश्न पडतो तो म्हणजे व्हिसाचा Visa. व्हिसा नसेल तर फॉरेन टूर कशी करणार असं अनेकांना वाटतं आणि प्लॅन Travel Plan तयार होण्याआधीच रद्द होतो. मात्र असे काही देश आहेत जिथं भारतीयांना प्रवेश करण्यासाठी तसचं फिरण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.

जवळपास ६० देशांमध्ये जाणासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता भासत नाही. या देशांमध्ये भारतीय साधारण एक महिना ते तीन महिने राहू शकतात आणि पर्यटक म्हणून फिरू शकता.

अशाच काही व्हिसाची आवश्यकता नसलेल्या आणि पर्यटनासाठी चांगला पर्याय असलेल्या देशांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या देशांमध्ये तुम्ही बिना व्हिसा सोलो ट्रीप किंवा फॅमिली ट्रीप प्लॅन कर शकता.

मॉरिशस- मॉलिशसमध्ये तुम्ही व्हिसा फ्री प्रवास करू शकता. मॉरिशसमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय ९० दिवस राहण्याची परवानगी मिळते. इथले सुंदर समुद्र किनारे आणि ज्वालीमुखी पासून तयार झालेल्या विविध पर्वतरांगा पाहण्यासारख्या आहेत.तसचं इथले जलाशयांना भेट देऊन स्ट्रीट फूडची चव तुम्ही चाखू शकता.

हे देखिल वाचा-

Foreign Tour Without Visa
Himachal Travel : हिमाचलच्या कुशीतली सुंदर नगीना; तुम्ही इथे भेट दिलीत का?

नेपाळ- भारताचं शेजारील देश म्हणजेच नेपाळमध्ये तुम्ही व्हिसाशिवाय प्रवेश करू शकता. नेपाळला तुम्ही ट्रेन किंवा ड्राइव्ह करूनही जाऊ शकता. तसंच भारत ते काठमांडू असा विमानप्रवासही तुम्ही करु शकता.

नेपाळला जाण्यासाठी तुमच्याकडे केवळ भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारं सरकारी ओळखपत्रं असणं बंधनकारक आहे. इथली सुंदर मंदिरं, हिमालयाच्या पर्वत रांगा आणि त्यातून वाहणाऱ्या नद्या. तसंच चितवन आणि बरडिया नॅशनल पार्क ही पर्यटन स्थळं आकर्षणाचा विषय आहेत.

भूतान- सुंदर डोंगर रांगा आणि मैदानं तसंच स्तूप पाहण्यासाठी तुम्ही भूतानला नक्की भेट देऊ शकता. भारताचं शेजारी देश असलेल्या भूतानला फिरण्यास जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा आवश्यक नाही. इथं देखील तुम्हाला भारतीय ओळखपत्र द्यावं लागेल.

बारबाडोस- बारबाडोस हा एक कॅरिबियन देश असून इथले समुद्रकिनारे जगातील सर्वात समुद्र किनारे म्हणून ओळखले जातात. समुद्र किनाऱ्यांसोबत इथं पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. स्कुबा डाइव्ह, सुंदर निसर्ग आणि अप्रतिम जेवण तुम्हाला भुरळ घालेल.

बारबाडोसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नाही. इथं तुम्ही बिना व्हिसा ९० दिवस म्हणजेच ३ महिने फिरू शकता.

मादागास्कर- मादागास्कर हा देश म्हणजे पूर्व अफ्रिकेतील एक मोठं बेट आहे. या देशाला चहूबाजुंनी हिंदी महासागराने वेढलेलं आहे. त्यामुळे इथं सुंदर समुद्र किनारे आणि सागरी वैभव पाहायला मिळतं.

मादागास्कर हे वेगवेगळ्या दुर्मिळ प्राण्यांचे आणि वनस्पतींचं माहेर घर म्हणून ओळखलं जात. जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि प्राणी प्रेमी असाल तर या सुंदर बेटाला नक्की भेट द्या. मादागास्करमध्ये तुम्ही बिना व्हिसा ३० दिवसांसाठी राहू शकता.

या देशांव्यतिरिक्त तुम्ही मालदीव या सुंदर बेटाला देखील भेट देऊ शकता. व्हिसा ऑन अरायव्हल Visa On Arrival म्हणजेच इथं पोहचून इथल्या विमानतळावर तुम्हाला सहज व्हिसा उपलब्ध होतो.

यासाठी भारतातून प्रवासापूर्वी व्हिसा मिळवण्याची आवश्यकता नाही. मालदीव प्रमाणेच थायलँड, इंडोनेशिया, मकाऊ या देशांमध्ये तुम्ही Visa On Arrival मिळवून ट्रीपची मजा लूटू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com