
आसाम आणि मेघालयमध्ये फिरायचे? लगेच बुक करा IRCTC चे पॅकेज
जर तुम्हाला आसाम आणि मेघायलमध्ये फिरण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) उत्कृष्ट आणि परवडणारे टूर पॅकेज ऑफर घेऊन आले आहे, या पॅकेजमध्ये तुम्हाला क्रुजने ब्रम्हपूत्रा नदी फिरण्याची संधी देखील मिळणार आहे. (Travel to Assam and Meghalaya Book IRCTC package immediately)
हेही वाचा: International Camel Festival: हेरिटेज वॉकने फेस्टिव्हल सुरु; दोन वर्षांनी जमली गर्दी
काय आहे हे टूर पॅकेज?
या पॅकेजमध्ये, IRCTC गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी आणि मेघालयच्या पूर्व खासी हिल्समधील माओलिनंग साइट कव्हर करता येतील. या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस प्रवास करायला मिळेल. प्रवाशांना टूर पॅकेजसाठी 32,315 रु. त्याच भाड्यात जीएसटीचा समावेश आहे.
IRCTC ने ट्विट केले आहे की, "ब्रह्मपुत्रा नदीवरील रोमांचक क्रूझचा आनंद घ्यायचा आहे? आमची 6D / 5N टूर बुक करा जी तुम्हाला ईशान्यकडील सर्वात प्रेक्षणीय स्थळांपैकी एकावर घेऊन जाईल."
हेही वाचा: Russia Ukraine युद्धामुळे भारतीयांचे उन्हाळ्यातील प्लॅन रद्द, सर्वेक्षणाचा निष्कर्ष
कधी सुरू होईल प्रवास?
या पॅकेजचा प्रवास 26 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. IRCTC वेबसाइट www.irctctourism.com वर जाऊन प्रवासी हे टूर पॅकेज ऑनलाइन बुक करू शकतात. IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते.
Web Title: Travel To Assam And Meghalaya Book Irctc Package Immediately
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..