Travelling Tips : प्रवासात एनर्जेटीक रहायला या टीप्स करतील मदत!

प्रवासाच्या उत्साहात बहुतेक लोक आहाराकडे लक्ष देत नाहीत
Travelling Tips
Travelling Tips esakal
Updated on

अनेक लोक ख्रिसमसमध्ये एखादी लाँग सुट्टी गाठून ट्रिप प्लॅन करतात. आणि नेमके फिरायला गेल्यावर आजारी पडतात. काहींना प्रवासाचा त्रास होतो तर काहींना बदललेल्या पाण्याचा आणि खाद्यपदार्थांचा. यामूळे प्रवासाची मजाच निघून जातात.

प्रवासाच्या उत्साहात बहुतेक लोक आहाराकडे लक्ष देत नाहीत. स्थानिक पदार्थांची नावे ऐकून ते सेवन केले जातात. तर काही लोक इतर काही हेल्दी मिळत नाही म्हणून ते लोक खातात. पण काही खास ट्रॅव्हल टिप्स सांगणार आहोत,  ज्या अवलंबून तुम्ही आजारी न पडता ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

तेलकट खाणे नको

प्रवासाला बाहेर पडल्यावर पकोडे, छोले भटुरे असे तेलकट पदार्थ लांबच्या प्रवासात सहज उपलब्ध होतात. मात्र सतत या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. म्हणूनच प्रवास करताना तळलेल्या गोष्टींपासून दूर राहणे चांगले.

Travelling Tips
Safety Tips For Adventure Trip : न्यू इयरसाठी अ‍ॅडव्हेंचर ट्रिपवर निघालात? फॉलो करा या टिप्स

व्हेजच खा

जे बहुतेक लोक मांसाहाराचे शौकीन असतात ते प्रवासाच्या ठिकाणच्या प्रसिद्ध मांसाहारी पदार्थाची चव घ्यायला उत्सुक असतात. पण प्रवासात नॉनव्हेज खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो. सहसा समुद्र किनारी फिरायला गेल्यावर सी फुड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. यासोबतच मळमळ आणि उलट्या होण्याचीही शक्यता असते.

Travelling Tips
Metkut Recipe : बारा महीने ज्याच्यासोबत मेतकूट जमतं अशा मेतकूट भाताची रेसिपी

दूध अंडी टाळा

काही लोक हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी प्रवास करताना ऑम्लेट आणि दूधाचे सेवन करतात. पण प्रवास करताना या गोष्टी पचवणे सोपे नसते. म्हणूनच प्रवासादरम्यान जलद पचण्याजोगे हलके अन्न खाणे चांगले.  

मद्यपान नको

काही लोक सहलीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मद्यपान करतात.  प्रवास करताना मद्यपान केल्याने डिहाइड्रेशन आणि ब्लोटिंग येऊ शकते. म्हणूनच प्रवासात दारू पिणे टाळा आणि हेल्दी ड्रिंक्स घ्या.    

Travelling Tips
Health Tips: पायाला सतत मुंग्या का येतात? तुम्ही या आजाराला निमंत्रण तर देत नाहीये; वाचा सविस्तर

खाण्यापिण्याकडे लक्ष द्या

प्रवासात शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामूळे प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका. वेळोवेळी पाणी पीत रहा. तसेच, शक्य असल्यास ज्यूस आणि नारळपाणीही प्या. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही आणि प्रवासातही तुम्हाला फ्रेश वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com