Metkut Recipe : बारा महीने ज्याच्यासोबत मेतकूट जमतं अशा मेतकूट भाताची रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metkut Recipe

Metkut Recipe : बारा महीने ज्याच्यासोबत मेतकूट जमतं अशा मेतकूट भाताची रेसिपी

Metkut Recipe : पारंपारिक मेतकूट हे महाराष्ट्रात खूप लोकांना आवडत... मेतकूट भात म्हटला की आजीची आठवण येते, गरमागरम आंबेमोहोर तांदळाचा मऊसूत भात, त्यावर मेतकूट, चवीला मीठ आणि ताटात तुपाची धार, सोबत पापड आणि लिंबाच लोणचं.. अर्थात स्वर्गसुख..

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

बरं फक्त चवीला छान असं नाही तर या मेतकूटात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटामीन्स सगळंच असतं. पण बाजारात मिळणार मेतकूट थोडं कडू लागतं, त्यात पटकन जाळ लागतं शिवाय घरच मेतकूट हे घरच असत.

हेही वाचा: Christmas 2022 : नक्की सॅंटा क्लोज म्हणजे कोण? का देत होते ते लहान मुलांना गिफ्ट

बघूया या मेतकूटाची पारंपरिक रेसिपी

1.5 कप हरभरा डाळ

3/4 कप उडीद डाळ

1/2 कप तांदूळ

1/4 कप मूग डाळ

1/4 कप गहू

2 टीस्पून मोहरी

1/2 टीस्पून मेथी दाणे

1 मध्यम हळकुंडे बारीक कुटून किंवा 1 टीस्पून हळद

2 मध्यम सुंठ कुडं

1/4 कप धणे सबंध

1/8 कप जीरे

5-6 सुक्या लाल मिरच्या देठं काढून

6-7 मीरे

4-5 लवंगा

1 दालचिनीचा तुकडा

1 हिंगाचा मध्यम आकाराचा खडा

1/2 टीस्पून हिंग

1/2 जायफळ किसून

2-3 वेलच्या

हेही वाचा: Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

कृती

1. साहित्यातील सगळे पदार्थ व्यवस्थित बाजूला काढून घ्या; सुंठ,दालचिनी,वेलची हे खलबत्यात बारीक कुटून घ्या.

2. एका कढईत हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मूगडाळ, गहू, तांदूळ एकेक करून वेगवेगळे खमंग भाजून घ्या.

3. नंतर धणे,जीरे वेगवेगळे खमंग भाजा आणि गरम कढईतच उरलेले सर्व मसाले मंद आचेवर कोरडे भाजून घ्या.

4. जायफळ किसून घ्या.

5. भाजलेल्या डाळी,गहू,तांदूळ व मसाले एकत्र करुन नीट मिक्स करून बारीक मिक्सरवर दळून घ्या..आता यात हळद आणि हिंग घालून परत एकदा मिक्सरवर फिरवून घ्या.