

CM Yogi Adityanath inaugurates international eco-tourism project at Dudhwa National Park
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील तराई भागात वसलेल्या दुधवा नॅशनल पार्कची शांतता, जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य आता एका नव्या दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश इको टूरिझम बोर्डाने दुधवाला आंतरराष्ट्रीय स्तराचे इको-टूरिझम हब बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला अंतिम रूप दिले आहे. या योजनेचा उद्देश दुधवापर्यंत पोहोचणे सोपे करणे, पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणे आणि या भागाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणे हा आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या योजना टप्प्याटप्प्याने जमिनीवर उतरतील आणि दुधवा परिसराला पर्यटन नकाशावर नवा चेहरा देतील.