Uttarakhand : पुढील तीन दिवस उंच ठिकाणी जाणे टाळावे; मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी केलं पर्यटकांना अवाहन

उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव सुरू आहे. त्यामुळे तिकडील पर्वतरांगांममध्ये हिमस्खलन होत आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Uttarakhand
Uttarakhand esakal
Updated on

Uttarakhand :

उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव सुरू आहे. त्यामुळे तिकडील पर्वतरांगांममध्ये हिमस्खलन होत आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हाच धोका लक्षात घेऊन उत्तराखंडचे सजग मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पर्यटकांना एक अवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना पुढील तीन दिवस हिमस्खलन होणाऱ्या भागात प्रवास करू नये असे सांगितले आहे.

हिमस्खलनाचा धोका लक्षात घेता, अती उंचीच्या क्षेत्राच्या विविध रिसॉर्ट्समध्ये राहणारे पर्यटक सुरक्षित ठिकाणी पाठविले जातील, असेही मुख्यमंत्री धामी म्हणाले. त्याच वेळी, स्थानिक प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

Uttarakhand
'सपा'च्या विजयासाठी ममता बॅनर्जी वाराणसीला जाणार; शिवमंदिरात लावणार दिवा

मुख्यमंत्री म्हणाले की, माणा येथून हवाई सर्वेक्षण करत असताना मला जाणवले की,अलकनंदा नदी हिमवर्षावामुळे पूर्णपणे गोठली आहे. यामुळे मी लगेचच आसपासच्या गावांकडे लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये याकडे जातीने लक्ष द्या, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याची आणि कोणतीही धोकादायक परिस्थिती असल्यास ताबडतोब संरक्षणात्मक पावले उचलण्याची सूचना त्यांनी सुरक्षा संस्थांना दिल्या आहेत. त्यांनी लवकरच एरियर सर्वेक्षण, मॅन्युअल सर्वेक्षण तसेच सॅटेलाइट सर्वेक्षण करून रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com