
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीचा (Utta Pradesh Assembly Election) प्रचारानं आता वेग घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला (Samajwadi Party) आपला पाठींबा जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात सपाचा विजय व्हावा यासाठी आपण वाराणसीला (Varanasi) जाऊन शिवमंदिरात दिवा लावून प्रार्थना करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (UP Election Samajwadi Party Support by Mamata Banerjee will go to Varanasi)
ममता म्हणाल्या, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी जिंकावी असं मला वाटतं. जर लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते सहज निवडणूक जिंकतील. यानंतर कोलकाता इथं बोलताना त्या म्हणाल्या, "मी वाराणसीला जाईन आणि शिवमंदिरात दिवा लावेल. मला माहिती आहे की, वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे. पण कोणीही कुठेही जाण्यास स्वतंत्र आहे. पंजाब मला आवडतो, पंजाबमध्ये आम्ही लोकसभा निवडणूक लढू"
दरम्यान, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सहारनपूर इथं पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "जर समाजवादी पार्टीनं सरकार स्थापन केलं तर १५ दिवसांत शेतकऱ्यांना ऊसाचा एफआरपी निश्चित करु. त्याशिवाय सर्व पिकांवर एमएसपी देण्यात येईल. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थिती मजबूत करण्यात येईल"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.