
Uttrakhand Tourism
Experience Heaven on Earth in Uttarakhand’s Scenic Villages :
लवकरच मुलांना शाळेला दिवाळीची सुट्टी लागेल. सण-समारंभाच्या काळात कुटुंबातील लोक एकत्र येतात. तेव्हा सुट्टीत नक्कीच बाहेरफिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. तूम्हीही प्लॅन करत असाल तर उत्तराखंडला जाण्याचा निर्णय पक्का करा. कारण, उत्तराखंडमधील सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यातील एक गाव अत्यंत सुंदर आहे.
चीन आणि नेपाळ सीमेवर वसलेले गुंजी गाव निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. सुमारे ११,००० फूट उंचीवर वसलेले हे गाव जितके रमणीय आणि ऐतिहासिक आहे, त्याहून अधिक ते आजच्या घडीला महत्त्वाचे आहे.
हे गाव इंडो-चायना व्यापाराचे केंद्र राहिले असून, कैलास-मानसरोवर यात्रेचे एक महत्त्वाचे टप्पे मानले जाते. चीन आणि नेपाळच्या सीमेवर असल्यामुळे याचे सामरिक महत्त्व देखील मोठे आहे.
Gunji-Village-Uttarakhand