

valley of flowers uttarakhand
esakal
निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्ग मानली जाणारी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ 'फुलांची दरी' (Valley of Flowers) सध्या आपल्या नैसर्गिक सौंदर्याच्या शिखरावर आहे. यंदाही पर्यटकांसाठी दरी खुली होताच देश-विदेशातील पर्यटकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, हिरवीगार कुरणे आणि उंच पर्वतरांगा पर्यटकांना मोहून टाकत आहेत.