

Air Travel Mistakes:
Sakal
Best Practices For Comfortable And Enjoyable Flight: आजकाल अनेक लोक लांबच्या प्रवासासाठी विमानाने प्रवास करतात. काही लोकांनी आधीच विमानाने प्रवास केला असेल आणि काही जण पहिल्यांदाच करण्याचा विचार करत असतील. जर तुम्हीही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या विमान प्रवासादरम्यान कोणत्या प्रकारचे कपड परिधान करावे किंवा टाळावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. काही गोष्टी परिधान करणे सामान्य आहे, परंतु विमानातील सुरक्षा नियमांनुसार, त्या कधीकधी योग्य नसतात.
जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा हा प्रवास सामान्य प्रवासापेक्षा थोडा वेगळा असतो. विमानातील वातावरण बरेच नियंत्रित असते, परंतु त्यात काही आव्हाने देखील असतात. जसे की हवेत आर्द्रता कमी असते, तापमानात चढ-उतार होऊ शकतात आणि बसण्याची जागा देखील मर्यादित असते. म्हणूनच, केवळ फॅशनसाठीच नव्हे तर आरामदायी वाटेल असेल कपडे परिधान करावे.