esakal | जगात 'या' देशात कधीच होत नाही 'रात्र': जाणून घ्या महत्वाची ठिकाणे
sakal

बोलून बातमी शोधा

बॅरो-अलास्का

जगात या देशात कधीच होत नाही 'रात्र': जाणून घ्या महत्वाची ठिकाणे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

फिरायची आवड असणारे लोक नेहमीच नाविन्य शोधत असतात. त्यांना नेहमीच वेगळ काहीतरी शोधायला आवडते. तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे दिवसाच्या नंतर रात्र आणि रात्रीच्या नंतर दिवसाचा प्रकाश असतो. तुम्हाला वाटेल यात काही नवीन नाही. पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे फक्त प्रकाश असतो, अंधार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला जगातील त्या 6 ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथे सूर्यास्त कधीच होत नाही. म्हणजेच ती ठिकाणे जिथे फक्त सकाळची शांतता असते रात्रीचा पहारा नाही.

नॉर्वे:

नॉर्वेला मिडनाइट सन या नावाने ओळखले जाते. जिथे मे ते जुलै या महिन्यात सूर्यास्त होत नाही. हे शहर ७६ दिवस अंधारापासून दूर राहते. नॉर्वेच्या स्वालबार्ड येथे १० एप्रिल ते २३ आॅगस्ट या महिन्यात सूर्य चमकत राहतो. हा युरोपचा उत्तरेकडील वस्ती असलेला प्रदेश आहे. ह्या काळात तुम्ही या ठिकाणा टूर प्लान करु शकता.

नुनावत-कनाडा

नुनावत हे फक्त 3,000 हून अधिक लोक असलेले शहर आहे, जे कॅनडाच्या वायव्य प्रदेशातील आर्क्टिक सर्कलच्या दोन अंशांवर बसलेले आहे. या ठिकाणी जवळजवळ दोन महिने 24X7 सूर्यप्रकाश दिसतो. तर हिवाळ्यात हे ठिकाण सलग 30 दिवस पूर्णपणे अंधारात बुडलेले दिसते.

आइसलँड

आइसलँड हे ग्रेट ब्रिटन नंतर युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. हा असा देश आहे जिथे तुम्हाला एकही डास सापडणार नाही. आइसलँडमध्ये जून महिन्यात सूर्य कधीच मावळत नाही. आणि रात्र देखील अशी दिसते की जणू दिवस उगवला आहे. जर तुम्हाला मध्यरात्रीसुद्धा हे सुंदर दृश्य पाहायचे असेल तर तुम्हाला एक्यूरेरी शहर आणि ग्रिम्सी द्वीपवर जावे लागेल.

बॅरो-अलास्का

हे शहर अलास्का मध्ये आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून जुलैच्या अखेरीपर्यंत बॅरोमध्ये सूर्य मावळत नाही. या उलट हिवाळ्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला 30 दिवस अंधार असतो . याला पोलर नाईट्स असेही म्हणतात. हे बर्फाच्छादित पर्वत आणि चित्तथरारक दृश्यांसह हिमनद्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात या ठिकाणी भेट देऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

फिनलँड

हजारो तलाव आणि बेटांची जमीन, फिनलँडचा बराचसा भाग उन्हाळ्यात फक्त 73 दिवस सूर्य दिसतो. तर याउलट हिवाळ्यात डार्क सावली असते. हा नजारा डिसेंबर ते जानेवारी पर्यंत पाहता येतो. पण ते फक्त आर्टिकल सर्कलाच्या भागांमध्ये दिसतो. याठिकाणी लोक उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जास्त झोपतात. येथे आपण नॉर्दन लाइट्स, स्कीइंग आणि काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता.

स्वीडन

मेच्या सुरुवातीपासून ऑगस्टच्या अखेरीपर्यंत स्वीडनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सूर्य मावळतो आणि देशात पुन्हा संध्याकाळी 4 वाजता परत येतो. हा असा देश आहे जिथे तुम्हाला वर्षातील सहा महिने सकाळ पहायला मिळेल. येथे गोल्फ खेळणे, मासेमारी करणे, ट्रेकिंग करणे असे बरेच खेळ खेळून आपला दिवस आनंदी घालवू शकता. निसर्गाचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी स्वीडन पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

loading image
go to top