फिरायला प्रत्येकाला आवडतं, फिरण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. भारतात दरवर्षी परदेशी पर्यटक हजेरी लावतात. तर, भारतातील लोकही पर्यटनासाठी देशातील काही ठिकाणांना भेटी देतात. भारतीय पर्यटक प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना भेटी देतातच. पण यंदा त्यांनी भारतातील अशा काही ठिकाणांना निवडलं जे फारसे चर्चेत नाहीत.
ही काही स्पेशल हिडन ठिकाणे त्यांच्या अद्वितीय सौंदर्य, शांतता आणि थरारक अनुभवासाठी ओळखली जातात. या ठिकाणांनी पर्यटकांना केवळ आकर्षित केले नाही तर व्यस्त जीवनशैलीपासून दूर निसर्गाच्या जवळ जाण्याची संधीही दिली.