अगदी कारनेही तुम्ही परदेश फिरू शकता, बघा कुठले देश आहे ते

singapur
singapurgoogle

अहमदनगर ः परदेशात फिरायला जायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु बहुतेकांचं हे स्वप्न पैशाअभावी अधुरं राहतं. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना वेळ नसतो. परंतु हौशी माणसाला यातलं काहीच लागत नाही. विमान प्रवास कशाला अगदी मोटारीतूनही तुम्ही परदेशात जाऊ शकता. तेही बजेटमध्ये.(You can even travel abroad by car, read what documents are required)

सिंगापूर हा देश कोणाला आवडणार नाही. निसर्गाने या देशाला भरभरून दिलं आहे. सिंगापूरला जायचं म्हणलं तर इंटरनॅशनल पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रॅव्हल डॉक्युमेंट, स्पेशल ओव्हरलँड परमीट, कार्नेट फी आणि विजा. या देशाचे अंतर ५ हजार ९२६ किलोमीटर आहे. दिल्लीहून तिकडे निघाला तर उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, नागालँड, मणिपूर, म्यानमार, थायलंड, मलेशियाहून सिंगापूरला जाऊ शकता.

singapur
भाजपतही राष्ट्रवादीच्या आमदाराचा बोलबाला

थायलंड ः दिल्लीहून थायलंडला सडकमार्गाने जाता येईल. मात्र, विमान प्रवास त्यापेक्षा स्वस्त आहे. रस्त्याने हे अंतर ४ हजार १९८ किलोमीटर आहे. ७१ तासांचा अवधी लागू शकतो. दिल्लीहून इन्फाळ, मोरेह, बागान, इन्ले लेक, यान्गोन, मायसोत, टाक आणि बँकॉकमार्गे थायलंडला पोचता येईल.

सडकमार्गाने जाताना परमीट, इंटरनॅशनल पासपोर्ट, २०० टक्के कान्रेट फी, लीड कार आणि विजा आवश्यक असतो.

मलेशिया - मलेशियाही एक सुंदर देश आहे. तेथील संध्याकाळ एकदम सुंदर आहे. तेथील आलिशान इमारती, समुद्र किनारे आकर्षक केंद्र आहेत. मलेशियाला जाताना थायलंड मार्गाने जावे.

श्रीलंका ः श्रीलंकेतील समुद्र किनारे लोकप्रिय आहेत. कन्याकुमारीहून हे अंतर फार कमी आहे तमीळनाडून नाव भाड्याने घेता येईल.

भुतान - जगातील भुतान हा देश एकदम खुशाल मानला जातो.तेथील शांती पर्यटकांना आकर्षित करून घेते. दिल्लीहून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसामहून भुतानला जाता येईल. या देशात जायला विसा लागत नाही. फार कमी कागदपत्रात हा देश फिरता येईल.

बांगलादेश ः हा देश भारतातूनच वेगळा झाला आहे. त्यामुळे तेथे रस्त्यांची सुविधा आहे. दिल्लीहून ते अंतर १ हजार ७१३ किलोमीटर आहे. पश्चिम बंगालहून अगदी हाकेच्या अंतरावर हा देश आहे. (You can even travel abroad by car, read what documents are required)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com