

19 minute viral video
esakal
भारतातील सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘१९ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओ’ हा विषय प्रचंड चर्चेत आहे. इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर हा ट्रेंड सर्वत्र पसरला असून लाखो युजर्स त्याबद्दल बोलत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि कुतूहलाने चौकशी करत आहेत. पण नेमका हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, कोणाचा आहे, हे कुणालाच नीट माहीत नाही. यामुळेच संभ्रम आणि गोंधळ वाढत चालला आहे.