Trending News : सहा मुलींची लग्न झाली, आता जेवण कोण बनवणार?"; साठीत आजोबा बनले नवरोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya Marriage
Trending News : सहा मुलींची लग्न झाली, आता जेवण कोण बनवणार?"; साठीत आजोबा बनले नवरोबा

Trending News : सहा मुलींची लग्न झाली, आता जेवण कोण बनवणार?"; साठीत आजोबा बनले नवरोबा

अयोध्येतलं एक लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ६५ वर्षीय व्यक्तीने आपल्यापेक्षा ४२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केलं आहे. या दोघांनीही हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे हे लग्न केलं असून यामध्ये जवळपास ५० लोक सहभागी झाले होते. याची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.

६५ वर्षीय नकछेद यादव अयोध्येतल्या बाराबंकी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यापासून त्यांना ६ मुली आहे. नकछेद यांनी आपल्या सगळ्या मुलींची लग्न लावून दिली. सगळ्यात छोट्या मुलीच्या लग्नानंतर मात्र ते अगदी एकटे पडले.

हेही वाचा - ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

घरी जेवण बनवायलाही कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. अखेर नातेवाईकांच्याच आग्रहानंतर नकछेद यादव दुसऱ्या लग्नाला तयार झाले. म्हणून त्यांनी २३ वर्षीय नंदिनीशी लग्न केलं.

आपण लग्नाला तयार नव्हतो, पण घरच्यांच्या आग्रहाखातर आपण हे लग्न केलं, असं नकछेद यादव म्हणाले. मुलीच्या घरचेही या लग्नासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लग्न झालेल्या मुली असताना वडिलांनी लग्न करणं चुकीचं असल्याचंही अनेक युजर्स म्हणत आहेत.

टॅग्स :Trending Photos