Viral Video : ...याला म्हणतात गायन! 8 वर्षाच्या पठ्ठ्याचं गायन ऐकायला प्रवासी उभे राहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Singing

Viral Video : ...याला म्हणतात गायन! 8 वर्षाच्या पठ्ठ्याचं गायन ऐकायला प्रवासी उभे राहिले

तुम्हाला संगीत आवडते? जर तुम्हाला संगीत आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही सध्या व्हायरल होत असलेल्या अवघ्या ८ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडाल. एक ८ वर्षाचा मुलगा ट्रेनमध्ये शास्त्रीय संगीत गात आहे तर सगळे प्रवासी त्याला दाद देत टाळ्या वाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही छान वाटेल.

हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

वाराणसी येथील काशी तामिळ संगम येथून परत येत असताना ट्रेनमध्ये एका बालकाने प्रवाशांना शास्त्रीय संगीत ऐकवून तृप्त केलं आहे. sangitha varier या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ दोन मिनीटाचा असून सूर्यनारायण असं गायन करत असलेल्या मुलाचे नाव आहे. तो चेन्नईचा असल्याची माहिती आहे. त्याच्या गायनातील भाव आपल्याला नि:शब्द करून टाकतील.

दरम्यान, ट्रेनच्या वरच्या सीटवर हा मुलगा बसला असून तामिळ भाषेतून तो गायन करत आहे. तर त्याला पाहण्यासाठी डब्यातील सगळे लोकं उभे राहिले आहेत. त्यातील बहुसंख्य लोकं आपापल्या फोनमधून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात मग्न असल्याचं व्हिडिओत दिसतंय. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे.

टॅग्स :bubble boyviral video