सोशल मीडियावर आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने स्वत:ला चाबकाचे फटे मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील असून हा नेता दुसरा कोणी नसून 'आप'चे राज्य प्रमुख गोपाल इटालिया यांचा आहे. गोपाल इटालिया यांनी सभेत आधी जाहीर माफी मागितली आणि नंतर बेल्ट काढून स्वत:ला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली. भाजप शासित गुजरातमध्ये झालेल्या विविध गुन्ह्यांतील पीडितांना न्याय देण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोपाल इटालिया यांनी स्वतःला ही शिक्षा दिली.