Video Viral : काच फोडून पळून जाताना झाला अपघात; शून्य मिनिटांत मिळाले कर्माचे फळ

कोणतेही वाईट काम करण्याच्या आधी अनेकवेळा विचार करायला हवा.
Video Viral
Video ViralSakal

आपण कोणतेही काम केले तर त्याचे फळ आपल्याला मिळते. वाईट किंवा चांगले कसलेही काम केले तर त्याचे आपल्याला कधी ना कधी फळ मिळतेच असं म्हणतात. वाईट कामाचे फळही वाईटच मिळते. त्यामुळे वाईट काम करताना किंवा एखाद्याचे नुकसान करताना विचार करायला पाहिजे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीला आपल्या कर्माचं फळ काही सेकंदातच मिळालं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका दुकानाची काच फोडताना दिसत आहे. त्याच्या शेजारी एक रस्ता असून त्यावर गाड्या लावल्या आहेत. सदर व्यक्ती लाथा मारून दुकानाची काच फोडून टाकतो. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना समोर उभा केलेल्या गाडीच्या मागून एक गाडी येते आणि क्षणात त्याला धडक देते. यामध्ये तो जखमी झाला आहे.

Video Viral
Man on Moon Video : "चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय, 21 तोफांची सलामी"; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

दरम्यान, ही घटना फक्त दोन ते तीन सेकंदाच्या आतमध्ये घडली आहे. सदर व्यक्तीला आपल्या वाईट कर्माचे फळ काही क्षणातच मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाईट काम करण्यापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com