HRITHIK ROSHAN SUFFERS SERIOUS INJURY VIRAL VIDEO
esakal
Hrithik Roshan Injury Update: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा डान्समुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अभिनयासह डान्सचे लाखो चाहते आहे. नेहमीच तो प्रोजेक्टमुळे तसंच त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. दरम्यान अशातच आता हृतिक रोशनच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे. कारण हृतिकला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला नीट चालताही येत नाही. सध्या सोशल मीडियावर हृतिकचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.