Viral Video : समृध्दी महामार्गावर आता स्टंटबाजीही सुरू; चक्क शॉटगन घेऊन पोहचला तरूण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samriddhi highway

Viral Video : समृध्दी महामार्गावर आता स्टंटबाजीही सुरू; चक्क शॉटगन घेऊन पोहचला तरूण

Samruddhi Highway News : काही दिवसांपासून समृध्दी महामार्गावर अपघाताच्या घटना पुढे येत आहेत. या मुळे हा महामार्ग चर्चेत असतानाच आता नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावरील एका स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका तरुणाने महामार्गाजवळील बोगद्याजवळ हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत महामार्गावरील बोगद्यासमोर गाडी उभी करुन बंदुकीतून गोळी झाडताना तरुण दिसतो आहे. या व्हिडिओतील व्यक्ती कोण? हा फोटो वा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केल्यानंतर नुकताच हा महामार्ग सामान्यांच्या प्रवासासाठी खुला झाला आहे.

हेही वाचा: Viral Video : दारूड्याला चावला विषय संपला; कोब्राच्याच तोंडातून फेस निघाला

लोकांसाठी खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी वेगवान समृद्धी महामार्गाबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरून प्रवास सुरू झाला. त्यात काही हौसे-गौसेही स्टंटबाजी, फोटोग्राफी करताना दिसून येत आहेत. हा तरूण स्कॉर्पिओ गाडीसमोर उभा राहून हवेत गोळीबार करताना फोटोमधून दिसत आहे.

हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या स्टंटचा फोटो सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सोशल मीडियावर वायरल होतोय. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेल्या समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर आपली मधोमध गाडी लावून थेट बंदुकीतून गोळी झाडतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला आहे. हा व्यक्ती कोण आणि हा फोटो कधी काढलेला आहे हे मात्र समोर आले नाही.

हेही वाचा: Ajit Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं. यानंतर चोवीस तासांतच समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्यावर पहिल्या अपघाताची नोंद झाली होता. आता रस्त्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.