AI Traffic Helmet : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही ! ट्रॅफिक पोलिसाचे काम करतेय 'हे' AI हेल्मेट, जागेवरच पाठवतेय दंडाची पावती
Traffic Rule Violation Detection : वाहतूक नियम मोडणाऱ्या बाईक किंवा कारचा व्हिडिओ हे हेल्मेट आपोआप रेकॉर्ड करते.नियमभंग ओळखल्यानंतर सिस्टम थेट ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार पाठवते. रस्त्यावर बेजबाबदार वाहनचालकांमुळे त्रस्त होऊन ही कल्पना सुचली आहे.
सध्या एका स्मार्ट आणि अनोख्या हेल्मेटने खळबळ उडवून दिली आहे. बेंगळुरूमधील एका तरुणाने हेल्मेटला वाहतूक पोलिसांचे डिव्हाईस बनवले आहे. या हेल्मेटला AI कॅमेरा असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे चालान जारी करत आहे.