धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

एका आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये हा प्रकार आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
Air India Flight
Air India Flightesakal

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात उड्डाणादरम्यान प्रवाशाच्या जेवणात ब्लेड आढळल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विमान कंपनीनं आपल्या स्टाफची ही चूक मान्य केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणावेळी अर्थात बंगळुरु ते सॅन फ्रान्सिस्कोकडं जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे. (Air India passenger finds metal blade in meal)

एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोग्रा यांनी या प्रकरणी निवेदन दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, "एअर इंडियानं हे कन्फर्म केलं आहे की, आमच्या एका उड्डाणावेळी एका प्रवाशाच्या जेवणात अखाद्य पदार्थ आढळून आला आहे. पण चौकशीनंतर लक्षात आलं की, आमच्या केटरिंग पार्टनर कंपनीनं भाज्या कापण्यासाठी वापरणाऱ्या प्रोसेसिंग मशिनचं ते ब्लेड आहे. चुकून ते जेवणात पडलं आणि तसंच पॅकिंगही झालं"

Air India Flight
Devesh Chandra Thakur: "मतं दिली नाहीत त्यामुळं मुस्लिमांची काम करणार नाही"; खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, आमच्या केटरिंग पार्टनर कंपनीकडून पुन्हा अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी आम्ही चांगल्या उपाययोजना करण्यासाठी काम करत आहोत. यामध्ये जेवण बनवण्याच्या प्रक्रियेची अधिववेळा तपासणीचा समावेश करण्यात आला आहे, असंही राजेश डोग्रा यांनी आपल्या निवदेनात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com