

viral Instagram video showing chaos in Air India's business class cabin during the Delhi-Bangkok flight after an intoxicated passenger allegedly urinated on fellow travellers
esakal
AIR India Viral Video : नवी दिल्ली ते बँकॉक जाणाऱ्या एअर इंडिया विमानात एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिझनेस क्लासमध्ये बसलेला एक मद्यधुंद मध्यमवयीन प्रवाशी स्वतःला उघडे करून इतर प्रवाशांवर लघवी करू लागला, असा गंभीर आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आणणारा २३ वर्षीय कंटेंट क्रिएटर शिवम राघव याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि सविस्तर वर्णन पोस्ट केले आहे ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली.