"जय महाराष्ट्र, हर हर महादेव, बजरंग बली..."; आकाश पाळण्यातील मुलाचा भन्नाट Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

"जय महाराष्ट्र, हर हर महादेव, बजरंग बली..."; आकाश पाळण्यातील मुलाचा भन्नाट Video Viral

कधी जत्रेतल्या आकाश पाळण्यात बसलाय? आकाश पाळण्यातून वर जाताना जास्त त्रास होत नाही पण खाली येताना सर्वांनाच खाली पडल्यासारखं वाटतं त्यामुळे आपण घाबरतो. लहान मुलं तर रडायलाच लागतात. तर अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. घाबरून तो बजरंगबली, हर हर महादेव असं म्हणताना या व्हिडिओत दिसतंय.

पॅराशूटमधील तो व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. "भाई सौ दोसौ ज्यादा लेले पर उतार दे" असं म्हणणारा व्यक्ती सर्वांना माहिती असेल. त्याचाच नेक्स्ट व्हर्जन हा लहान मुलगा आहे अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. तर भिती वाटते म्हणून जय बजरंगबली, हर हर महादेव, जय महाराष्ट्र असं तो म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर पप्पा मला उतरवा असंही तो म्हणत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

टॅग्स :viral video