

Alia Bhatt's Secret Water Revealed!
सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन समर रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) हा शो प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या शोच्या एका भागात बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट्ट पाहुणी म्हणून आली होती. शोदरम्यान आलियाने तर सर्वांचे लक्ष वेधलेच, पण त्याहूनही जास्त चर्चा रंगली ती तिच्या पाण्याच्या बाटलीची !
शोमध्ये जेव्हा समरने आलियाला प्रोटीन ड्रिंक आणि पाणी ऑफर केले, तेव्हा आलियाने हसत उत्तर दिले, "माझ्याकडे माझी स्वतःची पाण्याची बाटली आहे." यावर समरने फिरकी घेत विचारले, "हे काय श्रीमंतांचं पाणी (अमिरोवाला पाणी) आहे का ?" तेव्हा आलियाने खुलासा केला की, हे साधं पाणी नसून 'इलेक्ट्रोलाइट्स'युक्त पाणी आहे.
चला तर मग जाणून घेऊया आलियाच्या या स्पेशल पाण्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि हे पाणी प्रत्येकासाठी का महत्त्वाचे आहे.