

Why Cars Are a Necessity in Many American Cities
esakal
Public Transport and Car Dependency in America : भारतात एखादी व्यक्ती मर्सिडीज, बीएमडब्ल्यू किंवा ऑडीसारख्या आलिशान कारमधून उतरली की, तिच्याकडे मोठी संपत्ती असणार, असा सहज समज केला जातो. मात्र, अमेरिकेतील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. तिथे महागड्या ब्रँडच्या कार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसत असल्या, तरी त्या कार चालवणारा प्रत्येक व्यक्ती श्रीमंत किंवा कोट्यधीश असेलच, असे नाही. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या संजय दासलानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमधून याच वास्तवावर प्रकाश टाकला आहे.