
सोशल मीडियावर सध्या एक भक्तिमय नृत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भगरे गुरुजींची मुलगी आणि अभिनेत्री अनघा भगरे यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून, त्यात एक व्यक्ती भक्तीत तल्लीन होऊन नृत्य करताना दिसत आहे. “बम बम भोले”च्या तालावर सादर केलेला हा नृत्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.