Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Anand Mahindra announce help 10 year old boy Jaspreet selling rolls Viral Video marathi News
Anand Mahindra announce help 10 year old boy Jaspreet selling rolls Viral Video marathi News esakal

Anand Mahindra On Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक १० वर्षांचा मुलगा रस्त्याच्या बाजूला रोल विकताना दिसत आहे. या मुलाचा व्हिडीओ थोड्याच वेळात तुफान व्हायरल झाला असून याची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी या मुलाचा व्हिडीओ पाहून त्याच्यासाठी मदतीचा हात देखील पुढे केला आहे.

दहा वर्षांच्या या मुलाच्या वडिलांचे निधन झाले असून त्याची बहिण १४ वर्षांची आहे आणि तो त्याच्या चुलत्यांसोबत राहतो. आपले घर चालवण्यासाठी हा मुलगा दिल्लीच्या टिळक नगर भागात रोलची विक्री करतो. व्हिडीओमध्ये हा मुलगा सांगतो की, तो रोल तयार करणे आपल्या वडिलांकडून शिकला होता. एका युट्यूबरने या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे.

Anand Mahindra announce help 10 year old boy Jaspreet selling rolls Viral Video marathi News
Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

आनंद महिंद्रा यांनी मदत ऑफर केल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तो शेअर केला आहे. एक्सवर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी या मुलाच्या हिमतीचे कौतुक केले आहे. 'हिम्मतचे नाव जसप्रीत आहे. पण त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये. मला वाटतं तो टिळक नगर, दिल्लीत राहतो. कोणाकडे त्याचा संपर्क क्रमांक असल्यास कृपया शेअर करा. महिंद्रा फाऊंडेशनची टीम त्याच्या शिक्षणासाठी कशी मदत करू शकतो हे पाहिल., असे आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

Anand Mahindra announce help 10 year old boy Jaspreet selling rolls Viral Video marathi News
Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com